जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये कधी जमा होणार? EPFO दिली मोठी अपडेट

PF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये कधी जमा होणार? EPFO दिली मोठी अपडेट

पीएफच्या रकमेवरील व्याज कधी जमा होणार?

पीएफच्या रकमेवरील व्याज कधी जमा होणार?

पीएफ खातेदारांच्या खात्यावर व्याजाची रक्कम अद्याप पोहोचलेली नाही. याबाबत अकाउंट होल्डर्सकडून सतत ईपीएफओला प्रश्न विचारले जात आहेत. आता EPFO ​​ने याबाबत माहिती दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 मार्च: प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच PF अकाउंट होल्डर्स आपल्या जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजाची वाट पाहत आहेत. चालू आर्थिक वर्ष संपायला फारसा वेळ शिल्लक नाही. पण पीएफचे व्याज अद्याप लोकांच्या खात्यात जमा झालेले नाही. अकाउंट होल्डर्सकडून ट्विटरवर ईपीएफओकडे तक्रार केली जातेय. अशाच एका तक्रारीवर ईपीएफओने व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्याबाबत उत्तर दिले आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.1 टक्के व्याज निश्चित केले आहे.

खात्यात लवकरच येतील पैसे

ट्विटरवर उत्तर देताना ईपीएफओने सांगितले की, व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते लवकरच तुमच्या खात्यात दिसेल. व्याजाच्या रकमेची पेमेंट पूर्ण केली जाईल. अकाउंट होल्डरचे कोणतेही नुकसान होणार नाही. 6.5 कोटी लोकांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल, असे मानले जात आहे. EPFO खातेधारकांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. गेल्या काही वर्षांपासून खातेदारांना पीएफ व्याजाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

पीएफ नियमांमध्ये बदल

पीएफ नियमांमधील बदलाबाबत बोलताना, 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना सरकारने ईपीएफचे पैसे काढण्याबाबत दिलासा जाहीर केला होता. नवीन नियमानुसार, आता पीएफमध्ये जमा केलेले पैसे काढण्यावर टीडीएस कपात 30 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा अशा पीएफ खातेधारकांना होणार आहे ज्यांचे पीएफ खात्यात पॅन कार्ड अपडेट केलेले नाही. आतापर्यंत, जर एखाद्याचे पॅनकार्ड ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केलेले नसेल, तर त्याला पैसे काढल्यावर 30 टक्के दराने टीडीएस भरावा लागत होता.

UPI वरुन किती पैसे पाठवता येतात? SBI, HDFC सह प्रमुख बँकांची लिमिट काय?

सर्वात कमी व्याज दर

मार्च 2022 मध्ये, पीएफ खात्यातील ठेवींवर मिळणारा व्याज दर 8.5% वरून 8.1% पर्यंत कमी करण्यात आला होता. हा जवळपास 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी 1977-78 मध्ये 8% व्याजदर निश्चित करण्यात आला होता. तेव्हापासून ते सतत 8.25 टक्के किंवा त्याहून अधिक आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के व्याज उपलब्ध होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात