मराठी बातम्या /बातम्या /मनी /गहू स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घेणार मोठा निर्णय?

गहू स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घेणार मोठा निर्णय?

गेल्या 4  महिन्यात गव्हाचे दर 4 रुपये प्रति किलो इतके वाढले आहेत. तर वर्षभरात गव्हाचा आटा 17 ते 20 टक्क्यांनी महाग झाला आहे.

गेल्या 4 महिन्यात गव्हाचे दर 4 रुपये प्रति किलो इतके वाढले आहेत. तर वर्षभरात गव्हाचा आटा 17 ते 20 टक्क्यांनी महाग झाला आहे.

गेल्या 4 महिन्यात गव्हाचे दर 4 रुपये प्रति किलो इतके वाढले आहेत. तर वर्षभरात गव्हाचा आटा 17 ते 20 टक्क्यांनी महाग झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 27 डिसेंबर : गव्हाच्या किंमतींनी उच्चांक गाठल्यानंतर आता दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे गहू स्वस्त होऊ शकते. पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद झाल्यानंतर सरकार आता खुल्या बाजारात गहू विक्री कऱण्याची तयारी करत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, होलसेल दर 30 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. गव्हाची एमएसपी 20.15 रुपये प्रति किलो इतकी आहे. गेल्या 4  महिन्यात गव्हाचे दर 4 रुपये प्रति किलो इतके वाढले आहेत. तर वर्षभरात गव्हाचा आटा 17 ते 20 टक्क्यांनी महाग झाला आहे.

गहू स्वस्त करण्यासाठी सरकार पावले उचलण्याची शक्यता असून सरकार ओपन मार्केट सेल स्कीमच्या माध्यमातून गव्हाची विक्री करेल. सरकार 20 लाख मेट्रीक टन गहू बाजारात विकू शकते. पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद झाल्यानंतर सरकारकडे पर्याय खुले झाले आहेत. एक एप्रिलपर्यंत सरकारकडे 113 लाख टन गहू असेल. सध्याच्या नियमानुसार सरकारला 74 लाख टनांची गरज आहे.

हेही वाचा : LIC च्या ‘या’ योजनेत दररोज गुंतवा 200 रुपये, मिळतील 28 लाख रुपये

सकारला बफरनुसार 1 जानेवारीला 138 लाख टन गहू आवश्यक आहे. तर सरकारकडे आवश्यकतेपेक्षा 21 लाख मेट्रिक टन अतिरिक्त गहू असू शकतं. दिल्लीतील बाजारात गव्हाची किंमत सध्या 2915 रुपयांच्यावर गेली आहे. FCI कडून लहान व्यापाऱ्यांना 2250 रुपये प्रति क्विंटल दराने गहू विक्री केली जाते.

का महाग होतंय गहू आणि आटा?

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम किंमतीवर होत आहे. या युद्धामुळे मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कारण रशिया आणि युक्रेनमध्ये गहू उत्पादनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. सरकारने या वर्षी मे महिन्यात गहू निर्यात थांबवली होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात प्रत्यक्षात शिपमेंट हे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले होते.

First published:
top videos

    Tags: Central government, Food, India