मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वासामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे. सणासुदीच्या काळात तांदूळ आणि गव्हाच्या किंमती वेगवेगळ्या दिशेन जात आहेत. गव्हाची किंमत आणि गव्हाच्या पिठाची किंमत वाढताना पाहायला मिळत आहे. तर तांदळाच्या किंमती खाली उतरल्या आहेत. तांदळाच्या किंमतीमध्ये १२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर गैर बासमती तांदळाच्या किंमतीमध्ये ५ टक्क्यांनी घट झाली आहे. रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडिया (RFMFI) च्या अध्यक्षा अंजनी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन पीक येईपर्यंत गव्हाच्या किमती स्थिर राहतील. दिवाळीपर्यंत भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता तर बाजारात बासमती तांदळाची मोठी आवक झाल्यामुळे त्याचे भाव कमी झाल्याची माहिती मिळाली आहे. एका महिन्यापूर्वी गव्हाचे भाव साधारण 2,400 रुपये प्रति क्विंटल होते. आता प्रति क्विंटल गव्हासाठी दिल्लीमध्ये 2,525-2,550 रुपये मोजावे लागत आहेत. नवीन बासमती पिकाची आवक बाजारात सुरू झाल्याने दर खाली उतरले आहेत. ९ सप्टेंबरपासून काही ग्रेडच्या तांदळावर निर्यात शुल्क २० टक्क्यांनी जाहीर करण्यात आली. त्यामुळे किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे.
तांदळाच्या निर्यातीवर बंदी येण्याची भीती बाजारपेठेत आहे. त्यामुळे तांदळाचे दर घसरले आहेत. सणासुदीच्या काळात तांदळाचे दर घसरले खरे मात्र गव्हाचे दर वाढले आहेत. खरीप तांदूळ उत्पादनातही कमालीची घट झाल्याचं समोर आलं आहे.