मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दिवाळीपर्यंत भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता

दिवाळीपर्यंत भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता

हा निर्णय भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत 70 टक्के कच्चे तेल ओपेक देशांकडून आयात करतो.

हा निर्णय भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत 70 टक्के कच्चे तेल ओपेक देशांकडून आयात करतो.

हा निर्णय भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत 70 टक्के कच्चे तेल ओपेक देशांकडून आयात करतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC+) कच्च्या तेलाचे दिवसाला साधारण 20 लाख बॅरलने कमी उत्पादन करण्याबाबत विचार करत आहे. लवकरच या कपातीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

असं झाल्यास भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. त्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अनेक देश त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी इंधन वापरत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा प्रभाव तितका व्यापक होणार नाही.

हा निर्णय भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत 70 टक्के कच्चे तेल ओपेक देशांकडून आयात करतो. ओपेकमधून भारताची तेल आयात कमी झाली आहे. या कपातीचा आणखी एक पैलू म्हणजे तेलाची मागणी कमी झाल्यामुळे ओपेक देशांना हा निर्णय घेण्याचा विचार केल्याची माहिती मिळाली आहे.

आता प्लॅटिनम घेण्याचं स्वप्न अधूरंच राहणार, केंद्र सरकारनं वाढवलं आयात शुल्क

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली. ब्रेट क्रूड मंगळवारी 91.88 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. मात्र, त्याचा देशातील तेलाच्या किमतीवर विशेष परिणाम झालेला नाही. दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये मोजावे लागत आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिका सातत्याने आखाती देशांशी चर्चा करत आहे. हा निर्णय घेऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे इंधनाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत.

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! ATM मधून पैसे काढण्याआधी हा नियम जाणून घ्या

बायडेन प्रशासन तेलाच्या किमतीत वाढ होण्याच्या शक्यतेबद्दल चिंतेत आहे. ते म्हणाले की, ओपेकने मोठ्या प्रमाणावर उत्पादनात कपात केल्यास अमेरिकेकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. बायडन प्रशासनाला लोकांचा पाठिंबा असल्याने आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होऊ नये यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price