मुंबई : दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना आता इंटरनेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. जगभरात प्रसिद्ध असलेलं Whatsappची सेवा ठप्प झाली आहे. युजर्सना Whatsapp सेवेचा लाभ घेता येत नाहीत. कोणतेही मेसेज जात नसल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे संवाद साधण्यात अनेक अडथळे येत आहेत. जवळपास पाऊण तासापासून ही सेवा ठप्प असल्याची माहिती मिळाली आहे. व्हॉट्सअॅपकडून सेवा ठप्प का झाली याचं कारण अद्याप देण्यात आलं नाही. याआधी देखील Whatsapp ची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे युजर्सला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Whatsapp Windows Native App: फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, व्हॉट्सअॅपचं अप्रतिम फीचर लाँचअनेक ऑफिसमधील कामं देखील Whatsapp वर होत असतात. त्यामुळे ही कामंही खोळंबली आहेत. Whatsapp ची सेवा कशामुळे खोळंबली? ती कधी पूर्ववत होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. युजर्सला अजून किती प्रतीक्षा करावी लागणार आहे असं ट्वीट करून अनेक जण विचारत आहेत.