मुंबई, 19 सप्टेंबर: जर तुमच्याकडं मौल्यवान सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने असतील आणि ते तुम्ही घरात ठेवले असतील, तर तुमचे दागिने सुरक्षित आहेत की नाही अशी भीती नेहमीच असते. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही बँक लॉकर निवडता. कारण घरात ठेवलेले दागिने चोरीला जाऊ नयेत म्हणून तुम्हाला भीती वाटते. बँक लॉकरमध्ये दागिने ठेवणं प्रत्येकासाठी सोपं नसते. दागिने घरी ठेवण्याची प्रथा अजूनही अनेक भागात आहे. दागिने घरात ठेवल्यानं चोरीची शक्यता वाढते. मग दागिने घरात ठेवण्यासाठी काय करावं जेणेकरून तुमचे दागिने सुरक्षित राहतील? आता तुम्ही लॉकर न घेता तुमचे दागिने घरी सुरक्षित ठेवू शकता. तुम्ही दागिन्यांचे विमा कवच घेऊ शकता जेणेकरून दागिने चोरीला जाणे, घरातून गायब होणे अशा वेळी तुम्हाला आर्थिक नुकसानीची चिंता करावी लागणार नाही. विमा कंपन्या दागिन्यांच्या संरक्षणासाठी दोन प्रकारच्या पॉलिसी देतात. एक स्टँडअलोन ज्वेलरी पॉलिसी आणि दुसरी होम इन्शुरन्स पॉलिसी. होम इन्शुरन्स पॉलिसींना स्वतःच्या मर्यादा असतात. जर तुम्ही होम इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण घेत असाल, तर चोरी झाल्यास दागिन्यांची संपूर्ण किंमत उपलब्ध नसते. म्हणून, दागिन्यांच्या संपूर्ण संरक्षणासाठी तुम्ही नेहमी स्टँडअलोन ज्वेलरी पॉलिसी घ्यावी. ही पॉलिसी दागिन्यांसाठी संपूर्ण विमा संरक्षण प्रदान करते. ज्वेलरी इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी दागिन्यांचे बाजारमूल्यांकन करून घ्या. तुम्हाला ते जवळपासच्या कोणत्याही अधिकृत दागिन्यांच्या दुकानातून करता येईल. अन्यथा विमा दावा करताना विमा कंपनी तुमच्या दागिन्यांचे मूल्यांकन कमी करू शकते, ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. हेही वाचा: Solar Pump Yojana: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट, असा करा अर्ज विम्याचा प्रीमियम काय असू शकतो? दागिन्यांच्या विम्याचा हप्ता फारसा महाग नाही. विमा कंपन्या दागिन्यांच्या विम्यासाठी 1 लाख रुपयांच्या विमा रकमेवर 1,000 रुपये प्रीमियम आकारतात. म्हणजेच, जर तुमच्याकडे 10 लाख रुपयांचे दागिने असतील तर तुम्हाला वार्षिक 10,000 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही एकाच वेळी इतर वस्तूंचे कव्हर घेतल्यास विमा कंपनी प्रीमियममध्ये सूट देखील देते. या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या- दागिन्यांसाठी पॉलिसी घेण्यापूर्वी त्याचे परताव्याचे नियम नीट वाचा. विमा कंपनीची परतावा पॉलिसी काय आहे? दागिने गहाळ झाल्यास क्लेम करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रक्रियेचं पालन करावं लागेल याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरच पॉलिसी घेण्याचा निर्णय घ्या. ज्वेलरी पॉलिसीमध्ये आग आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई दिली जाते. म्हणून सर्वप्रथम, तुम्हाला पॉलिसीचे नियम चांगले माहित असले पाहिजेत त्यानंतरच पॉलिसी घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.