जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 20 वर्षांनी दरमहा दीड लाख रुपये मिळवायचे आहेत? मग आता करा इतकी गुंतवणूक

20 वर्षांनी दरमहा दीड लाख रुपये मिळवायचे आहेत? मग आता करा इतकी गुंतवणूक

20 वर्षांनी दरमहा दीड लाख रुपये मिळवायचे आहेत? मग आता करा इतकी गुंतवणूक

आयुष्यासाठी तसंच इतर महत्त्वाच्या खर्चांची तरतूद करण्यासाठी म्युच्युअल फंड एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे.

    भविष्याची तरतूद करण्यासाठी कमी जोखीम आणि उत्तम परतावा देणारा गुंतवणूक पर्याय म्हणून म्युच्युअल फंड (Mutual Fund) लोकप्रिय आहे. थेट शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करण्याची जोखीम टाळून तिथं मिळणाऱ्या परताव्याचा लाभ देणारा असा हा पर्याय आहे. यामध्ये एफडी अर्थात मुदत ठेव(Fixed Deposit-FD), पोस्टातील अल्प बचत योजनांच्या तुलनेत जोखीम थोडी जास्त असते; मात्र यातून मिळणारा परतावा (Return) हा एफडीपेक्षा जास्त असतो. अलीकडच्या काळात मुदत ठेव (FD), भविष्य निर्वाह निधी (PPF), आवृत्ती ठेव योजना (Recurring Deposit) यांचे व्याजदर (Interest Rates) कमी होत असल्यानं त्यातून मिळणारा परतावा कमी होत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अधिक परतावा देणाऱ्या मात्र जोखीम कमी असणाऱ्या पर्यायाची गरज आहे. ती गरज म्युच्युअल फंड योजनांमुळे पूर्ण होत आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास त्यातून उत्तम परतावा मिळू शकतो आणि त्यातील जोखीमही कमी होते. त्यामुळं निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तसंच इतर महत्त्वाच्या खर्चांची तरतूद करण्यासाठी म्युच्युअल फंड एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. टीव्ही9 भारतवर्षने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भविष्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक भविष्यासाठी गुंतवणूक करताना महागाईचाही (Inflation) विचार करणं गरजेचं असतं. समजा तुम्हाला 20 वर्षांनंतर लागणाऱ्या खर्चाची तरतूद करायची आहे, तर महागाईचा दर गृहीत धरून आजच्या तुलनेत लागणारा खर्च काढणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात तुम्हाला महिना 40 हजार रुपये खर्च येत असेल तर, महागाईचा दर 6 टक्के धरला तर आणखी 20 वर्षांनी ही रक्कम एक लाख 28 हजार रुपये असेल. महगाईचा दर 7 टक्के धरला तर ही रक्कम एक लाख 55 हजार आणि 8 टक्के दर धरल्यास ती एक लाख 86 हजार रुपये असेल. याचाच अर्थ तुम्हाला वीस वर्षानंतर दरमहा एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल इतकी गुंतवणूक 20 वर्षांच्या कालावधीत करणं आवश्यक आहे. हे वाचा - सोनं-चांदी खरेदी करायचं असेल तर आजचे भाव फायद्याचे, चेक करा आजचे रेट परतावा किती मिळेल यानुसार गुंतवणूक करणं आवश्यक म्युच्युअल फंडात सध्या एक रकमी 50 लाख रुपये गुंतवले आणि सरासरी दहा टक्के परतावा गृहीत धरला तर 20 वर्षांनी 3 कोटी 36 लाख रुपये जमा होतील. 11 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम 4 कोटी असेल आणि 12 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम 4.82 कोटी रुपये असेल. मुदत संपल्यानंतर दरवर्षी या रकमेतील 4 टक्के रक्कम काढली, तर साधारण दीड लाख रुपये मिळतील. याबाबत अधिक माहिती देताना माय फंड बाजारचे विनीत खंडारे म्हणाले की, ‘20 वर्षांनी दरमहा दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असेल तर आता एकरकमी 50 लाख गुंतवणे आवश्यक आहे. यासाठी एचडीएफसी बॅलन्स फंड (HDFC Balanced Fund), आयसीआयसीआय बॅलन्स्ड अॅडव्हान्स फंड (ICICI Balanced Fund) या योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. थोडी जोखीम घेण्यास तयार असलेले गुंतवणूकदार आदित्य बिर्ला सन लाईफ इक्विटी अॅडव्हांटेज (Aditya Birla Sun Life Equity Advantage) आणि एसबीआय फ्लेक्सी कॅप फंडांची (SBI Flexi Cap Fund) निवड करू शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात