Home /News /money /

SBI Deposit Machine मध्ये पैसे भरुनही रक्कम खात्यावर जमा झाली नाही? इकडे नोंदवा तक्रार

SBI Deposit Machine मध्ये पैसे भरुनही रक्कम खात्यावर जमा झाली नाही? इकडे नोंदवा तक्रार

रक्कम डिपॉझिट करताना जर मशीन (Cash Deposit Machine) नादुरुस्त झालं किंवा पैसे जमा झाले नाहीत तर काय, असा प्रश्न ग्राहकांना नेहमी पडतो.

मुंबई, 21 ऑगस्ट : गेल्या काही वर्षात सर्वच बॅंकांनी (Bank) आपल्या व्यवहारविषयक सुविधा ऑनलाइन (Online) केल्या आहेत. ग्राहकांना बँक शाखेत येऊन रांगेत थांबून व्यवहार करावे लागू नयेत, यासाठी बॅंकांनी ऑनलाइन सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. कोरोना काळात (Corona) तर या सुविधांचा वापर आणि महत्व अधिकच अधोरेखित झाले आहे. ऑनलाइन सुविधेमुळे बँक शाखेत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी जाण्याची गरज राहिलेली नाही. देशातील महत्वाच्या बॅंकांपैकी एक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) देखील आपल्या ग्राहकांसाठी बँकिंग प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. या बॅंकेने बहुतांश सुविधा या ऑनलाइन केल्या आहेत. या बॅंकेने आपले एटीएम इतके अत्याधुनिक केले आहेत की पैसे काढण्याव्यतिरिक्त अनेक कामे या मशीनच्या माध्यमातून केली जातात. रक्कम डिपॉझिट (Cash Deposit) करण्यासाठी आता ग्राहकांना या बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही, कारण हे काम देखील 24 तासात केव्हाही ग्राहक या मशीनच्या माध्यमातून करु शकतात. परंतु, रक्कम डिपॉझिट करताना जर मशीन नादुरुस्त झालं किंवा पैसे जमा झाले नाहीत तर काय, असा प्रश्न ग्राहकांना नेहमी पडतो. एसबीआयने ग्राहकांसाठी अनेक ठिकाणी एडीडब्ल्यूएम (ADWM) मशीन बसवली आहेत. ही मशीन एटीएम प्रमाणे (ATM) आहेत. या मशीनच्या माध्यमातून ग्राहक बॅंक खात्यावर पैसे जमा करु शकतात. तसंच या मशीनच्या माध्यमातून आता पैसे काढता देखील येऊ शकतात, अशी माहिती एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिली आहे. मात्र अनेकदा काही तांत्रिक अडचणींमुळे एटीएम किंवा कॅश डिपॉझिट मशीनमध्ये (CDM) पैसे भरुन देखील ते खात्यावर जमा झाले नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येऊ लागल्या आहेत. असं घडल्यास काय करावं, याबाबत संबंधित ग्राहकाला फारशी माहिती नसते. एका ग्राहकाने या समस्येबाबत ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून तक्रार केली असता एसबीआयने आपल्या अधिकृत हॅण्डलवरून ट्वीट करत यासाठीच्या प्रक्रियेबाबतची माहिती ग्राहकांना दिली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कॅश डिपॉझिट मशीनच्या माध्यमातून पैसे भरल्यानंतर ते संबंधित ग्राहकाच्या बॅंक खात्यावर जमा न झाल्यास ग्राहकाने https://crcf.sbi.co.in./ccf/ या वेबसाइटवर जात EXISTING CUSTOMER//MSME/Agri/Other Grievance मधील GENERAL BANKING/ BRANCH RELATED Category येथे यासंबंधी तक्रार दाखल करावी. यात ट्रान्झॅक्शन डेट, रक्कम, बेनिफिशियरी अकाउंट नंबर आणि सीडीएम मशीनचे लोकेशन लिहावे. याशिवाय 1800112211, 18004253800 या टोल फ्री क्रमांकांवर किंवा 080-26599990 या क्रमांकांवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत तक्रार दाखल करावी, असंही बँकेने सांगितलं आहे.
First published:

Tags: SBI, Sbi ATM

पुढील बातम्या