• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • PPF अकाउंट मॅच्युअर झाल्यावर तुमच्याकडे काय काय पर्याय असतात?

PPF अकाउंट मॅच्युअर झाल्यावर तुमच्याकडे काय काय पर्याय असतात?

पीपीएफची (PPF) गुंतवणूक, त्यावरचं व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम सगळं टॅक्स फ्री असतं.

  • Share this:
मुंबई, 06 मे : पैशांची गुंतवणूक ही आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या गरजांनुसार नियोजन करून बचत करणं आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं हे सगळ्यांचं उद्दिष्ट असतं. सामान्य मध्यमवर्गीय नागरिक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे असं सगळेच मानतात. दीर्घकालीन गुंतवणूक खरोखरच पीपीएफमध्ये करावी कारण त्याला सरकारी योजना असल्यामुळे रक्कम बुडण्याची जोखीम कमी असते. मासिक गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ हा उत्तम पर्याय आहे. या योजनेत सध्या वार्षिक व्याज 7.1 टक्के दिलं जातं. पीपीएफची गुंतवणूक, त्यावरचं व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम सगळं टॅक्स फ्री असतं. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर पीपीएफ खातं उघडाल तेवढा फायदा जास्त. हे वाचा - RBI कडून कर्ज पुनर्रचना योजनेची घोषणा; लहान व्यावसायिक, कर्जदारांना मोठा दिलासा या खात्याचा मॅच्युरिटी पिरेड 15 वर्षांचा असतो.  त्यामुळे हे खातं मॅच्युअर झालं की काय करायचं? असा प्रश्न येतोच. पीपीएफ खातं मॅच्युअर झालं की गुंतवणूकदाराकडे तीन पर्याय उपलब्ध असतात. त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. पर्याय पहिला – अकाउंट बंद करून पैसे काढून घ्या. तुमचं पीपीएफ अकाउंट मॅच्युअर झाल्यावर तुम्ही ते बंद करू शकता. गुंतवलेली सगळी रक्कम काढून घ्या. ती रक्कम टॅक्स फ्री असेल. ती आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पण त्यासाठी तुम्ही जिथं खातं काढलं आहे त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मॅच्युरिटीनंतर पैसे बँक खात्यात जमा करण्याची विनंती करणारा एक अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागेल. हे वाचा - दररोज करा 150 रुपयांची गुंतवणूक, मुदतीनंतर मिळेल दुप्पट रक्कम पर्याय दुसरा - नव्या गुंतवणुकीसह मुदत 5 वर्षांनी वाढवा. मॅच्युरिटीनंतर जर तुम्हाला पैशांची आवश्यकता नसेल तर तुम्ही त्याच खात्याची मुदत अजून पाच वर्षं वाढवू शकता. त्यासाठी आणखी थोडी रक्कम गुंतवू शकता. जर तुम्हाला मुदत वाढवायची असेल तर तुम्हाला खातं मॅच्युअर होण्याआधी एक वर्ष बँकेत अर्ज द्यावा लागेल. या पुढच्या 5 वर्षांच्या मुदतीत तुम्हाला गरज पडली तर तुम्ही पैसे काढू शकता. पर्याय तिसरा - मुदत वाढवा गुंतवणूक नको. पीपीएफ खातं मॅच्युअर झाल्यानंतरही डिअॅक्टिव्हेट होत नाही म्हणजे त्या रकमेवर कुठला दंड पडत नाही. जर तुम्हाला पैसे काढायचेही नसतील आणि नवी गुंतवणूक करायची नसेल तर तुम्ही तुमची रक्कम त्या खात्यात तशीच ठेवू शकता आणि 5 वर्षांपर्यंत मुदत वाढवून घेऊ शकता. त्यासाठी गुंतवणुकीची गरज नाही. त्याचबरोबर कुठलाही अर्ज भरायची गरज नाही. पुढची पाच वर्षं तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळत राहील.
First published: