फ्रॉड पॅन कार्डच्या घटनांनंतर इन्कम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आयडीमध्ये क्यूआर कोड जोडणे सुरू केले आहे. आता जेवढे पॅन कार्ड बनवले जात आहेत, त्यात क्यूआर कोड एम्बेडेड असतो. हाच क्यूआर कोड पॅन कार्ड खरं आहे की बनावट याची ओळख आहे. तुम्ही स्मार्टफोन आणि इन्कम टॅक्स विभागाच्या अॅपच्या मदतीने पॅन कार्डवरील क्यूआर कोडद्वारे त्याची सत्यता पडताळून पाहू शकता.
पॅन कार्डची करा पडताळणी- याकरता सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाचे पोर्टल www.incometax.gov.in/iec/foportal यावर जावे लागेल. याठिकाणी Verify your PAN च्या लिंकवर क्लिक करा. नवीन पेज ओपन झाल्यावर तिथे तुमची सर्व माहिती प्रविष्ट करा. नंबर, पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर पोर्टलवर एक मेसेज येईल की तुम्ही दिलेली माहिती पॅनकार्डच्या डेटाशी जुळते आहे की नाही. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या पॅनची पडताळणी करू शकता.
पॅनकार्ड हा महत्त्वाचा सरकारी दस्तावेज आहे. बँकिंग किंवा इतर आर्थिक कामांमध्ये PAN आवश्यकता असते. बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे, वाहन खरेदी करणे किंवा विक्री करणे, आयटीआर दाखल करणे, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त दागिने खरेदी करणे यासह अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.