मुंबई, 30 जानेवारी : बहुतांश लोकांनी आयकर भरला असेल. तुम्ही तुमच्या कराबद्दल चिंतेत असल्यास, त्याचे नियोजन करून कर वाचवू शकता. यासाठी तुम्हाला सोप्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल. भारतात दोन प्रकारचे कर भरावे लागतात - प्रत्यक्ष कर (Direct Tax) आणि अप्रत्यक्ष कर (Indirect Tax). यातून अप्रत्यक्ष कर टाळण्याचा कोणताही मार्ग नाही, पण प्रत्यक्ष कर नक्कीच कमी करता येईल. मात्र, त्यासाठी विशेष नियोजन आवश्यक आहे. हे नवीन वर्ष आहे, त्यामुळे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या आधारे तुमचे कर नियोजन लवकरात लवकर करा. PPF, NPS आणि लाइफ इन्शुरन्स प्रीमियम यासह 10 मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे कर कमी करू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) कर वाचवण्यासाठी पीपीएफ हा फार पूर्वीपासून पसंतीचा पर्याय आहे. या अंतर्गत, प्रत्येक आर्थिक वर्षात तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय तुम्हाला यावर 7-9 टक्के रिटर्नही मिळू शकतो. PPF वर सरकारी हमी आहे, म्हणजेच हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक आणि कर बचत पर्यायांपैकी एक आहे. पीपीएफमध्ये गुंतवणुकीचा फायदा असा आहे की त्यात जमा केलेले भांडवल, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम हे सर्व करमुक्त आहे. मात्र त्यात गुंतवलेले भांडवल 15 वर्षांसाठी साठवले जाते, म्हणजेच अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी हा चांगला पर्याय नाही. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) NPS ही सरकारद्वारे स्पॉन्सर पेन्शन योजना आहे, ज्यावर कर सवलत देखील उपलब्ध आहे. करदाते कलम 80CCD(1B) अंतर्गत 50,000 रुपयांच्या करक कपातीचा दावा करू शकतात आणि हा लाभ कलम 80C अंतर्गत उपलब्ध असलेल्या फायद्यांव्यतिरिक्त आहे. फोन हरवला असेल तर लगेच करा हे काम, अन्यथा तुमचं बँक खातं होईल रिकामं जीवन विमा पॉलिसी (LIC) जीवन विमा पॉलिसी अधिक लोकप्रिय होत आहेत. तुम्ही या पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकता. मात्र हा लाभ घेण्यासाठी, विमा संरक्षण प्रीमियम रकमेच्या दहापट किंवा अधिक असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) जोखीम सहन करू शकत नाही अशा करदात्यांना कर वाचवण्याचा आणखी एक सरकारी पर्याय आहे NSC (National Saving Scheme). गुंतवणुकीसाठी किमान रकमेची आवश्यकता नाही, परंतु कलम 80C अंतर्गत केवळ 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर कर बचतीचा दावा केला जाऊ शकतो. याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे, याचा अर्थ रिस्क न घेणाऱ्यांसाठी हा एक चांगला अल्पकालीन कर बचत पर्याय असू शकतो. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Savings Scheme- ELSS) कर बचतीसाठी ELSS अधिकाधिक लोकप्रिय होत आहे कारण ते इक्विटी आधारित आहे म्हणजेच बाजाराशी जोडलेले आहे, त्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता आहे. या व्यतिरिक्त, हा एक पसंतीचा पर्याय देखील बनत आहे कारण सर्व कर बचत पर्यायांमध्ये सर्वात कमी लॉक-इन कालावधी आहे. ELSS चा लॉक इन कालावधी 3 वर्षांचा आहे. त्यात जमा केलेल्या पैशांवर कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा लाभ मिळू शकतो. गृहकर्ज (Home Loan) तुम्ही घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या मूळ रकमेवर कलम 80C अंतर्गत 1.6 लाख रुपयांची सूट मिळवू शकता. याशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजावर आयकर कलम 24B अंतर्गत अतिरिक्त कर वाचवू शकतो. HDFC Securities ची ‘या’ स्मॉलकॅप फायनान्स स्टॉकवर नजर, चेक करा टार्गेट कर बचत एफडी पाच वर्षांच्या मुदतीसह कर बचत एफडी हे ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांसाठी पसंतीच्या कर बचत पर्यायांपैकी एक आहेत. याद्वारे कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा लाभ घेता येईल. तथापि, FD वर मिळणाऱ्या व्याजावर TDS (Tax Deducted at Source) आकारला जातो, जो फॉर्म 15G भरून वाचवला जाऊ शकतो. सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Yojna) मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही त्याच्या खात्यात जमा केलेल्या पैशावर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. कर सवलतीचा लाभ केवळ या खात्यात जमा केलेल्या पैशांवरच नाही तर जमा केलेल्या पैशांवर मिळणाऱ्या व्याजावरही मिळतो. मुलांची शिकवणी फी पगारातून उत्पन्न असेल तर 2 मुलांपर्यंतच्या शिक्षणावरही कर बचत करता येते. तुम्ही दोन मुलांपर्यंतच्या शिक्षणासाठी कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकता. बचत खात्यावर मिळणारे व्याज तुमचे कोणत्याही बँकेत बचत खाते असेल, तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरही तुम्हाला कर लाभ मिळतात. 60 वर्षांखालील करदाते बचत खात्यावर 10 हजार रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात आणि जास्त वय असणारे करदाते म्हणजेच ज्येष्ठ नागरिक 50 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावरील कर वाचवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







