• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • इंधन दरवाढीचं टेन्शन का घ्यायचं? 71 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री मिळवा, कसं?

इंधन दरवाढीचं टेन्शन का घ्यायचं? 71 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री मिळवा, कसं?

Indian Oil Citi credit card चा वापर करून मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून, ग्राहक दरवर्षी 71 लिटर Petrol आणि Diesel खरेदी करू शकतात.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Rate hike) गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ थांबत नाहीयेत. त्यामुळे  इंधनवाढीबाबत सामान्य जनता चिंतीत आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेल खरेदीवर सूट मिळाली तर चांगलंच आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदी करताना इंडियन ऑईल सिटी क्रेडिट कार्ड (Indian Oil Citi credit card) फायदेशीर ठरू शकते. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दरवर्षी 71 लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत मिळवू शकते. वेगवेगळी क्रेडिट कार्ड तुम्ही मिळवलेले रिवॉर्ड पॉईंट रिडीम (Reward Point Redeem) करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स देतात. उदाहरणार्थ, ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून रेल्वे तिकिटे बुक करू शकता. त्याचप्रमाणे, काही क्रेडिट कार्ड आहेत जे इंधन किरकोळ विक्रेत्यांसोबत को-ब्रँडिंगनंतर जारी केले जातात आणि रिवॉर्ड पॉईंटच्या बदल्यात पेट्रोल-डिझेल देतात. इंडियन ऑईल सिटी क्रेडिट कार्ड हे देखील असंच एक कार्ड आहे. या कार्डचा वापर करून मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून, ग्राहक दरवर्षी 71 लिटर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतात. Petrol-Diesel Price: पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं, 20 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये
  इंडियन ऑईल पंपवर टर्बो पॉईंट्स रिडीम करून प्रतिवर्ष 71 लिटर पर्यंत इंधन मोफत मिळू शकते. >> इंडियन ऑईल पंपांवर 1 टक्के इंधन अधिभार (Fuel Surcharge) माफ. >> इंडियन ऑईल पंपांवर खर्च केलेल्या प्रति 150 रुपयांमध्ये 4 टर्बो पॉइंट मिळतात. >> कार्डद्वारे किराणा आणि सुपरमार्केटमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 150 रुपयांसाठी 2 टर्बो पॉइंट मिळतात. >> कार्डद्वारे इतर श्रेणींमध्ये 150 रुपये खर्च केल्यास 1 टर्बो पॉईंट मिळतो. Petrol-Diesel Price Today: ऑक्टोबरमध्ये 18 वेळा इंधन दरवाढ, आज पुन्हा भडकलं पेट्रोल-डिझेल
  टर्बो पॉइंट्स रिडीम कसे करणार? >> टर्बो पॉइंट्स अनेक प्रकारे रिडीम केले जाऊ शकतात. परंतु इंडियन ऑईल पंपांवर रिडीम केल्याने जास्तीत जास्त फायदा होतो. >> इंडियन ऑईल पंपवर रिडेम्शन रेट - 1 टर्बो पॉईंट = 1 रुपया आहे. >> goibibo.com, IndiGo, मेक माय ट्रिप, yatra.com वर रिडम्पशन रेट 1 टर्बो पॉइंट = 25 पैसे आहे. >> बुक माय शो, व्होडाफोन इ. वर रिडम्पशन रेट 1 टर्बो पॉईंट = 30 पैसे आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: