मुंबई, 26 ऑक्टोबर: इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि जीएसटी बद्दल सर्वांना माहिती आहे. पण तुम्ही पिंक टॅक्सबद्दल ऐकलंय का? पिंक टॅक्स हा प्राप्तिकर, जीएसटी पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ज्यांना पिंक टॅक्सची माहिती नाही, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की पिंक टॅक्स इतर करांसाठी नाही, जे सरकारकडून आकारले जातात. तर यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांना जादा पैसे मोजावे लागतात. या पिंक टॅक्सच्या माध्यमातून कंपन्या तुमचा कर कापून घेत आहेत. बहुतेकांना याबद्दल माहिती नाही, परंतु दुसऱ्या मार्गाने आपला खिसा रिकामा करत आहेत. याचा सर्वाधिक फटका थेट महिलांना बसत आहे. पिंक टॅक्स हा सामान्य कर नाही हा टॅक्स जंडर बेस्ड प्राइज डिस्क्रिमिनेशन आहे, जो स्त्रिया त्यांच्या वस्तू आणि सेवांसाठी देतात. सरासरी महिलांना त्यांनी खरेदी केलेल्या उत्पादनांवर 7% जास्त पैसे आकारले जातात. दुसरीकडे आपण पर्सनल केअरवर पाहिल्यास हा फरक 13 टक्के येतो. हेही वाचा: SBI सोबत एकदाच करा ‘हे’ काम, दर महिन्याला होईल बक्कळ कमाई
पिंक टॅक्स म्हणजे काय? पिंक टॅक्स देशभरातून जेंडरनुसार कराच्या स्वरूपात गोळा केला जातो. विशेषतः जेव्हा एखादे उत्पादन महिलांसाठी डिझाइन केलेले असते. यासोबतच कंपनी परफ्यूम, पेन, बॅग आणि कपड्यांसाठी महिलांकडून जास्त शुल्क घेते. भारतातील महिलांना उत्पादनांच्या किमतीपेक्षा हा गुलाबी कर अधिक भरावा लागतो. उदाहरण म्हणून सलूनसारख्या अनेक ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त शुल्क आकारले जाते. दुसरीकडे बॉडी वॉश, साबण, क्रीम यासारखे महिलांचे प्रॉडक्ट्स पुरुषांच्या तुलनेत महाग आहेत. दुसरीकडे केस कापण्यासाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. जाणून घ्या काय आहे कारण? यामागचे कारण असं मानलं जातं की स्त्रिया किमतीच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. त्यांना उत्पादनं आवडल्यास आणि त्यांची किंमतही चांगली असल्यास आवडल्यास त्या खरेदी करतात. यामुळेच कंपन्या महिलांकडून जास्त पैसे घेतात. ही आता कंपन्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनली आहे. यामुळे कंपन्या महिलांपेक्षा जास्त कर आकारतात, ज्यामुळे त्यांची कमाई अनेक पटींनी वाढते.