मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय का? तज्ज्ञांचं उत्तर वाचा

ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय का? तज्ज्ञांचं उत्तर वाचा

म्युच्युअल फंडात तुमचे पैसे व्यावसायिक फर्म किंवा तज्ञाद्वारे मॅनेज केले जातात.

म्युच्युअल फंडात तुमचे पैसे व्यावसायिक फर्म किंवा तज्ञाद्वारे मॅनेज केले जातात.

म्युच्युअल फंडात तुमचे पैसे व्यावसायिक फर्म किंवा तज्ञाद्वारे मॅनेज केले जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 2 ऑक्टोबर : सध्या बाजारात अनेक प्रकारचे गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे. मात्र, कोणता आपल्यासाठी योग्य आहे? यावर अनेकांचा गोंधळ होतो. तुम्हीदेखील यापैकीच एक असाल तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिला जातो. येथे तुमचे पैसे व्यावसायिक फर्म किंवा एक्सपर्टद्वारे मॅनेज केले जातात. तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवता आणि कुठे नाही याची काळजी करण्याची गरज नाही. तुमचा फंड मॅनेजर तुमच्यासाठी हे काम करतो.

दुसरे म्हणजे, तुम्हाला म्युच्युअल फंडातून खूप चांगला परतावा मिळतो. हे निश्चितपणे थोडे धोकादायक आहे. मात्र, परताव्याच्या बाबतीत चांगल्या गुंतवणूक पर्यायांना तो मागे टाकतो. तुम्ही त्यात पैसे गुंतवू शकता आणि SIP देखील सुरू करू शकता. म्हणजेच म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे फ्लेक्सिबल पर्याय आहे. हीच कारणे म्युच्युअल फंडांना ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणूक पर्याय बनवतात.

तज्ज्ञांचे मत काय?

लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात, Fintoo च्या सीएफपी निधी मनचंदा म्हणतात की म्युच्युअल फंडातील ज्येष्ठ नागरिक त्यांना पाहिजे तेव्हा पैसे काढू शकतात. यात एनपीएस किंवा इतर कोणत्याही पेन्शन योजनेसारखा लॉक-इन कालावधी नाही. याशिवाय, त्या असेही म्हणतात की म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या एसेट क्लासमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील मिळतो.

वाचा - युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? भारतातील पहिलं Unicorn Startup कोणतं? वाचा

पैसे गुंतवण्याचा सल्ला देताना ते म्हणाले की, निवृत्तीनंतर पहिली 5 वर्षे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आवश्यक असणारे पैसे डेट म्युच्युअल फंडात टाकाला पाहिजे. त्यानंतर 5 वर्षांच्या खर्चासाठी आवश्यक असलेली शिल्लक म्युच्युअल फंडात आणि 10 वर्षांनंतर आवश्यक असलेली रक्कम इक्विटी लार्ज कॅप फंडांमध्ये टाकावी.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली

एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये 12693 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. या वर्षी मे पासून आतापर्यंत, एसआयपी गुंतवणूक दरमहा 12000 कोटी रुपयांच्या वर आहे. जुलैमध्ये ती 12,139 कोटी रुपये होती. दुसरीकडे, जर आपण म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीबद्दल बोललो, तर ऑगस्टमध्ये ती 65,077 कोटी रुपये होती. जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 2.75 पट अधिक आहे. डेट आधारित म्युच्युअल फंडांमध्ये सर्वाधिक 49,164 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर जुलैमध्ये केवळ 4930 कोटी रुपये आले होते. ऑगस्टमध्ये, सर्व म्युच्युअल फंडांचे एयूएम (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) 39,33,877 कोटी रुपये होते.

First published:

Tags: Investment, Mutual Funds