जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बँक कसं ठरवते कोणाला किती लोन द्यायचं? नेमका काय आहे नियम

बँक कसं ठरवते कोणाला किती लोन द्यायचं? नेमका काय आहे नियम

बँक कसं ठरवते कोणाला किती लोन द्यायचं? नेमका काय आहे नियम

बँक कोणाला किती लोन द्यायचं हे कशावर ठरवते आणि कसं ठरवते असा कधी विचार केला आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आपण लोन घ्यायला जातो आणि आपल्याला बँक ढिगभर कागदपत्र जमा करण्याची लिस्ट आपल्या हातात ठेवते. काहीवेळा आपण लोनसाठी ऑनलाईन अर्ज करतो आणि त्यानंतर कागदपत्र जमा करावी लागतात. पण बँक कोणाला किती लोन द्यायचं हे कशावर ठरवते आणि कसं ठरवते असा कधी विचार केला आहे का? बँक लोन देताना लोन घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासते. ती व्यक्ती लोन घेतल्यानंतर फेडू शकते की नाही त्या व्यक्तीला किती लोन द्यायचं हे सगळं त्यावर अवलंबून असतं. जेवढा सिबिल स्कोअर चांगला तेवढा जास्त लोन आणि व्याजदर जास्त लागणार नाही. जेवढा सिबिल स्कोअर वाईट तेवढा तुम्हाला जास्त व्याजदराने व्याज मिळणार सिबिल स्कोअरचा फुलफॉर्म क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड असा होतो. हा स्कोअर 300-900 पर्यंत साधारण असतो. सिबिल स्कोअर नेहमी तीन अंकांमध्ये मोजला जातो.

क्रेडिट कार्ड वापरता सावधान! तुमच्यासोबतही हे घडू शकतं

चांगला सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय? 750 ते 900 सिबिल स्कोअर हा सर्वोत्तम मानला जातो. 650-750 या श्रेणीतील सिबिल स्कोअर चांगला मानला जातो. 550-650 हा अॅव्हरेज असतो. 300-500 मधील सिबिल स्कोअर हा अत्यंत वाईट किंवा खराब समजला जातो. तुमच्या सिबिल स्कोअर जेवढा चांगला तेवढ कमी व्याजदरात जास्त लोन मिळतं. खराब सिबिल स्कोअरमुळे लोन मिळण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. सिबिल स्कोअर आपल्या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारे बनविला जातो. गेल्या ३६ महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीकडे ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर तयार केला जातो, त्याच्याकडे पाहिले जाते. यामध्ये सर्व प्रकारची कर्जे, क्रेडिट कार्ड खर्च, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर आदींचा समावेश आहे. आपण त्यासाठी कसा खर्च केला आणि पैसे दिले हे पाहिले जाते.

Loan घेताय थांबा! Flat lendingआणि Reducing Interest Rate मधील फरक समजून घ्या
News18लोकमत
News18लोकमत

तुम्हाला चेक करता येणार का सिबिल स्कोअर? सिबिलच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. सिबिल स्कोअर मिळवा निवडा. त्यानंतर ईमेल आयडी, नाव आणि पासवर्ड टाका. आयडी प्रूफ सबमिट करा. यानंतर पिन कोड, जन्मतारीख आणि फोन नंबर टाका. एक्सेप्ट करा आणि पुढे जा. मोबाइलवर आलेल्या ओटीपीवर क्लिक करून पुढे जा. डॅशबोर्डवर जाऊन तुमचा सिबिल स्कोअर चेक करा. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सिबिल स्कोअर मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात