मराठी बातम्या /बातम्या /मनी /bearer cheque नक्की काय असतो, पैसे खात्यावर येण्यासाठी किती वेळ लागतो?

bearer cheque नक्की काय असतो, पैसे खात्यावर येण्यासाठी किती वेळ लागतो?

बेअरर चेक म्हणजे काय?

बेअरर चेक म्हणजे काय?

आधी account payee आणि bearer cheque या दोन्हीत नेमका काय फरक आहे ते समजून घेऊया.

मुंबई : सध्या ऑनलाईन व्यवहारांमुळे चेक फार कमी दिले जातात. मात्र अजूनही DD किंवा चेक देणं बंद झालं नाही. त्यामुळे बऱ्याच संस्था किंवा मोठ्या वस्तू घेताना चेक दिले जातात. मोठ्या व्यवहारांसाठी चेकचा उपयोग केला जातो. चेक देतानाही अनेक गोष्टी असतात, त्यापैकी आज आपण बेअरर चेक म्हणजे काय हे समजून घेणार आहोत.

आधी account payee आणि bearer cheque या दोन्हीत नेमका काय फरक आहे ते समजून घेऊया. तुमच्या हातातील चेकला अकाउंट पेई चेक म्हणतात. तुम्ही ज्याच्या नावाने देता त्याला ते पैसे काढता येतात.

बेअरर चेक तुम्ही खात्यातून डायरेक्ट इनकॅश करू शकता. ज्याच्या नावाने तो चेक दिला आहे त्याच्या खात्यावर पैसे असणं बंधनकारक नाही. हा चेक दिल्यानंतर खात्यावर पैसे जमा होत नाहीत तर तुम्ही थेट बँकेतून पैसे काढून घेऊन जाऊ शकता. हा चेक इतर कोणाच्याही हाती लागला तर तो तुमचे पैसे घेऊन जाऊ शकतो, तुम्हाला फसवू शकतो हा सर्वात मोठा धोका असतो.

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, हेलपाटे घालण्याची गरज नाही; बँकेनं सुरू केलीय खास सेवा

चेक देताना डाव्या बाजूनला वरच्या कोपऱ्यात दोन रेषा काढू नका. त्यामुळे पैसे खात्यावर जमा होतात. हा चेक दुसऱ्या कोणाच्याही हातात लागणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागला तर तुमचे पैसे गेलेच म्हणून समजा. ज्या तारखेला हा चेक दिला आहे त्याच तारखेला त्याला बँकेतून पैसे काढणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे आहेत की नाही याची काळजी घ्या.

Personal Loan : 'या' 10 बँका देतात सर्वात स्वस्त पर्सनल Loan, पटापट चेक करा व्याजदर

बेअरर चेक बँकेत दिल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे मिळतात. कॅश काउंटरवर जमा केल्यानंतर तुमच्या हातात पैसे येतात. अकाउंट पेई चेक दिला तर मात्र क्लिअर होण्यासाठी वेळ लागतो. तो चेक त्याच बँकेचा असेल तर लवकर होतो नाहीतर 6 ते २४ तास जातात. दुसरीकडे, लोकल क्लिअरिंगला 3 दिवस लागतात. म्हणजे तिसऱ्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतात.

First published:
top videos

    Tags: Bank services, Money, Money18