मुंबई : जेव्हा आपल्याकडे पैशांची कडकी असते तेव्हा आपण असलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू गहाण ठेवायला जातो. बऱ्याचदा त्याही नसतील तर आवश्यक त्या गरजा भागवण्यासाठी किंवा पैशांची निकड पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन चा आधार घेतला जातो. पर्सनल लोन खूप पटकन मिळतं मात्र त्यावर लागणारं व्याज फार भयंकर असतं. मात्र आता तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. याचं कारण म्हणजे 10 बँका अगदी स्वस्तात पर्सनल लोन देत आहेत. त्यामुळे तुम्ही या बँकांकडून पर्सनल लोन घेऊ शकता. ज्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे अशा लोकांना बँका कमी व्याजदरात हे लोन देत आहेत. तुम्ही कमी व्याजदरात कोणत्या कोणत्या बँकेकडून लोन घेऊ शकता जाणून घेऊया. बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन देते. वर्षाला व्याज दर 10 टक्क्यांपर्यंत आहे. साधारण व्याजदराचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे. बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 10.25 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देत आहे. ही बँक 20 लाखांपर्यंत पर्सनल लोन देते. कर्जाची कमाल मुदत 84 महिने आहे.
लोनही असतात गुड आणि बॅड! पण ते कसं ओळखायचं? ही आहे ट्रिकइंडसइंड बँक इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना रु. 30,000 ते रु. 50 लाखांपर्यंत पर्सनल लोन देते. या बँकेत 10.25 टक्के ते 27 टक्के व्याजदर आहे. कर्जाचा कालावधी 1 वर्ष ते 6 वर्षांपर्यंत आहे.
पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन देते. येथे व्याज दर 10.4 टक्के ते 16.95 टक्के आहे. कर्जाची अवधी मुदत 60 महिन्यांपर्यंत आहे.
पत्नीसोबत जॉईंट होम लोनचे `हे` फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेअॅक्सिस बँक अॅक्सिस बँक रु. 50,000 ते रु. 1 लाख पर्यंत पर्सनल लोन देते. बँकेतील व्याज दर 10.49 टक्क्यांपासून सुरू होतो आणि कालावधी 60 महिन्यांपर्यंत जाऊ शकतो. IDFC फर्स्ट बँक IDFC फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांना 10.49 टक्के व्याजदराने वैपर्सनल लोनदेते. कर्जाची मुदत 6 महिने ते 5 वर्षांपर्यंत असतं. या बँकेकडून जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकतं. एचडीएफसी बँक HDFC बँक आपल्या ग्राहकांना 10.5 टक्के ते 24 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देते. कर्जाची कमाल मुदत ५ वर्षे आहे. या बँकेकडून पर्सनल लोन म्हणून जास्तीत जास्त 40 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली जाऊ शकते.
तुम्हीही होम लोन घेतलंय का? कधीच करु नका या चुका, अन्यथाकरूर वैश्य बँक करूर वैश्य बँक आपल्या ग्राहकांना रु. 10 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते. या बँकेतील वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10.5 ते 13.5 टक्क्यांपर्यंत आहे. IDBI बँक IDBI बँक आपल्या ग्राहकांना 60 महिन्यांच्या कालावधीसाठी 10.5 ते 15.5 टक्के व्याजदरानं जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन देतं. आयसीआयसीआय बँक ICICI बँक आपल्या ग्राहकांना 6 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 10.75 ते 19 टक्के व्याजदराने 50 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन देतं.