जाहिरात
मराठी बातम्या / मनी / गृहकर्जाचा EMI वेळेवर न भरण्याचे काय परिणाम होतात? कठीण प्रसंगांना कसं द्यावं तोंड?

गृहकर्जाचा EMI वेळेवर न भरण्याचे काय परिणाम होतात? कठीण प्रसंगांना कसं द्यावं तोंड?

गृहकर्जाचा EMI वेळेवर न भरण्याचे काय परिणाम होतात? कठीण प्रसंगांना कसं द्यावं तोंड?

गृहकर्जाचा EMI वेळेवर न भरण्याचे काय परिणाम होतात? कठीण प्रसंगांना कसं द्यावं तोंड?

गृहकर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही तर क्रेडिट स्कोअर घसरण्यासह अनेक समस्या उद्भवू शकतात, परंतु योग्य धोरण अवलंबल्यास परिस्थिती हाताळता येते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर: घर खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड ही मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक ईएमआय म्हणजेच कर्जाचा हप्ता वेळेवर भरणं फार महत्वाचं आहे. मात्र कोणत्याही कारणानं कर्जाचा हप्ता वेळेवर जमा झाला नाही, तर कर्जदारानं काय करावं? तुम्ही काही कारणास्तव ईएमआय भरण्यास विसरलात किंवा कोणत्याही आर्थिक संकटामुळं तो भरू शकत नसाल, तर या दोन्ही परिस्थितींमध्ये सावधगिरीनं आणि समजून घेऊन पुढील पावलं उचलली पाहिजेत. गृहकर्ज घेणार्‍यंने कोणत्या परिस्थितीत काय करावं हे समजून घेऊ. कर्जाचा हप्ता न भरल्यानं काय परिणाम होतो? गृहकर्जाचे एक किंवा दोन हप्ते फेडण्यात अयशस्वी होणं म्हणजे मायनर डिफॉल्ट श्रेणीमध्ये समाविष्ट होणं. परंतु जर EMI सलग 3 महिने भरला नाही तर तो एक मोठा डिफॉल्ट मानला जातो. अशा कोणत्याही डीफॉल्टचा क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम होतो. मायन डिफॉल्टच्या बाबतीत CIBIL स्कोअर 40 ते 80 गुणांनी कमी केला जातो. जर हप्ता वेळेवर भरला नाही, तर EMI रकमेच्या 2 टक्के इतका दंड देखील भरावा लागेल. यासंबंधीच्या अटी गृहकर्ज देणा-या किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीवर अवलंबून असतात, जे आधीच ठरलेले असतात. जर तुम्ही फक्त एकदाच हप्त्याचे पेमेंट चुकवले आणि नंतर दर महिन्याला नियमित परतफेड सुरू केली तर तुमचा क्रेडिट स्कोअर पुनर्संचयित केला जाऊ शकतो. परंतु असं न केल्यास CIBIL स्कोअरमध्ये मोठी घसरण होऊ शकते. CIBIL स्कोअर कमी झाल्यास कर्जाचा व्याजदरही वाढू शकतो. ज्या ग्राहकांचे क्रेडिट स्कोअर चांगले नाहीत त्यांना कर्ज देण्यास बँका किंवा वित्तीय संस्था कचरतात. एकदा तुम्ही मेजर डिफॉल्ट श्रेणीत आलात की ते आणखी कठीण होते. दीर्घकाळापर्यंत कर्जाचे हप्ते न भरल्याबद्दल बँकाही नोटीस बजावतात, ज्याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कर्जदारावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँका गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव देखील करू शकतात.  आपण हप्ता भरण्यास सक्षम नसल्यास प्रथम काय करावे? जर तुम्ही गृहकर्जाचा हप्ता जमा करू शकत नसाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेला सांगावे आणि तुम्ही हप्ता का जमा केला नाही हे देखील सांगावे. जर तुम्ही खरोखरच हप्ता जमा करायला विसरला असाल, तर तुम्ही भविष्यात असं करणं टाळावं. पुढील वेळी अशी चूक टाळण्यासाठी तुम्ही ऑटोपे पर्याय देखील निवडू शकता. यासाठी तुम्ही बँक खात्यातून आपोआप हप्ता कापून संबंधित प्रक्रियेद्वारे लिंक करू शकता. हेही वाचा:  खुशखबर! दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय तुम्ही कोणत्याही महिन्यासाठी तुमचा EMI वेळेवर भरू शकत नसाल तर बँकेला कारण स्पष्टपणे सांगा. जर तुम्ही कोणत्याही कारणाने हप्ता भरायला विसरला असाल तर लवकरात लवकर जमा करा. भविष्यात असं होऊ नये म्हणून तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिटद्वारे दरमहा हप्ता भरण्याची व्यवस्था करा. परंतु जर तुम्ही नोकरी गमावल्यामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे उत्पन्न कमी झाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर त्यास सामोरे जाण्यासाठी शक्य तितक्या लवकर तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही आपत्कालीन निधीची मदत घेऊ शकता, नवीन नोकरी करू शकता किंवा कोणत्याही योजनेत केलेली गुंतवणूक सरेंडर करून कर्जाची परतफेड करण्याची व्यवस्था करू शकता. तुम्ही कर्ज पुरवणाऱ्या वित्तीय संस्थेशी बोलून गृहकर्जाची मुदत वाढवण्याची विनंती देखील करू शकता. यामुळं तुम्हाला थोडा दिलासा मिळू शकतो. आर्थिक संकट गंभीर असल्यास तुम्ही तुमचे सध्याचे घर भाड्यानं देण्याचा आणि कमी भाड्यानं लहान घरात स्थलांतरित होण्याचा विचार करू शकता. असं केल्यानं तुम्ही तुमचं घर न गमावता हप्ता जमा करण्याची व्यवस्था करू शकता. BankBazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी सांगतात की, जर तुम्ही हप्ता वेळेवर जमा केला नाही तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो. हप्ता भरण्यास उशीर झाल्यानुसार, बँक निश्चित अटी व शर्तींच्या आधारे तुमच्याकडून दंड वसूल करते. जर तुम्ही कोणत्याही कारणाने हप्ता जमा करायला विसरला असाल तर लवकरात लवकर जमा करा. जर तुम्ही आर्थिक संकटात अडकले असाल आणि हप्त्याची रक्कम जमा करू शकत नसाल, तर तुमच्या बँकेला कळवा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करत रहा.  कर्ज खाते सुधारण्यासाठी हे देखील करा- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अनावश्यक खर्च कमी करा. अशा प्रकारे बचत आणि हप्ता भरण्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीला अनुकूल असे बजेट बनवा. त्यात हळूहळू सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहा. 3 हप्ते फेडण्यात अयशस्वी झाल्यास नवीन कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते, तरीही निधीची व्यवस्था करण्याचे सर्व मार्ग बंद नाहीत. आर्थिक संकटाच्या काळात जर आपण पद्धतशीर आर्थिक धोरण राबवले तर आपण समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात