जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 5Gमुळं सामान्य व्यावसायिकांना होणार मोठा फायदा; वाचा हा स्पेशल रिपोर्ट

5Gमुळं सामान्य व्यावसायिकांना होणार मोठा फायदा; वाचा हा स्पेशल रिपोर्ट

5Gमुळं सामान्य व्यावसायिकांना होणार मोठा फायदा; वाचा हा स्पेशल रिपोर्ट

सध्याच्या 4G LTE नेटवर्कपासून पुढे जाताना, 5व्या पिढीच्या नेटवर्कची म्हणजेच 5G ची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. 5G नेटवर्कमुळं व्यावसायिकांना माणसाला दूरवरच्या ग्राहकांशी संपर्क साधण्यास मदत करेल. जाणून घ्या काय असतील हे फायदे, जे व्यावसायिकाला मिळतील?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर: केंद्र सरकारनं नुकताच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला आहे. इंटरनेट आणि दळणवळणाच्या जगात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यानं व्यापार जगताचं चित्रही बदलणार आहे. सर्वसामान्य व्यावसायिकांना 5G चे काय फायदे होतील, आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.  उत्तम कनेक्टिव्हिटीसह व्यवसायाचा विस्तार होईल- सध्याच्या 4G LTE नेटवर्कनंतर पुढे जाताना 5व्या पिढीच्या नेटवर्कची म्हणजेच 5G ची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. त्यामुळं व्यावसायिकांना दूरवरच्या ग्राहकांशी संपर्क साधण्यास मदत होईल. कोविड 19 च्या उद्रेकादरम्यान आभासी बाजार आणि ऑनलाइन व्यवसायात प्रचंड तेजी आली आहे. 5G सुरू झाल्यानंतर त्यात आणखी एक मोठी वाढ अपेक्षित आहे. कामाची कार्यक्षमता वाढेल- 5G तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्यावसायिकांना त्यांची अधिकाधिक उपकरणं इंटरनेटशी जोडून व्यवसाय तंत्रज्ञानावर आधारित बनवता येईल. यासोबतच दूरस्थपणे व्यवसाय चालवणं सोपं होईल, ज्यामुळं व्यावसायिकांची कार्यक्षमताही वाढेल. हेही वाचा:  5G च्या नादात बॅंक अकाउंट रिकामं व्हायचा धोका, ही चूक करू नका! पोलिसांचा इशारा विश्वासार्हता वाढेल- 5G तंत्रज्ञानामुळं मोबाईल नेटवर्कचा वेग मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच ड्रॉप कॉल आणि कनेक्टिव्हिटीतील व्यत्यय अशा अडथळ्यांना दूर करेल. आरोग्यसेवा किंवा डेटा स्टोरेज यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतलेल्या व्यवसायांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरेल. खर्च कमी केल्याने नफा वाढेल- 5G नेटवर्कवरील अधिक उपकरणांद्वारे एकाच वेळी अधिक ग्राहकांशी कनेक्ट करून व्यापाऱ्यांचा ग्राहक सपोर्ट वेगाने वाढेल. व्यवसायिक उपकरणांचे बॅटरी आयुष्य 10 पट वाढण्याची अपेक्षा आहे. या बचतीमुळे त्यांचा नफा वाढेल. AR-VR चा फायदा अनेक क्षेत्रांना होईल- 5G नेटवर्क्स ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतील. मनोरंजन, पर्यटन, उत्पादन, रिअल इस्टेट आणि बांधकाम यासारख्या उद्योगांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

ग्रामीण भागात व्यावसाय विस्तार करणं सोपे होईल- 5G तंत्रज्ञान व्यवसायांना त्याच्या चांगल्या नेटवर्क कव्हरेजद्वारे देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांशी कनेक्ट होण्याची संधी देखील प्राप्त होईल. यामुळे ऑनलाइन कृषी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय विशेषतः किरकोळ क्षेत्रासह अधिक सुलभ होईल आणि त्यांचा ग्राहकवर्ग झपाट्याने वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 5G
  • First Published :
जाहिरात
जाहिरात