जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5G च्या नादात बॅंक अकाउंट रिकामं व्हायचा धोका, ही चूक करू नका! पोलिसांचा इशारा

5G च्या नादात बॅंक अकाउंट रिकामं व्हायचा धोका, ही चूक करू नका! पोलिसांचा इशारा

5G च्या नादात बॅंक अकाउंट रिकामं व्हायचा धोका, ही चूक करू नका! पोलिसांचा इशारा

देशात नुकतीच 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. काही शहरांमध्ये या सेवेला प्रारंभदेखील झाला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 17 ऑक्टोबर : देशात नुकतीच 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. काही शहरांमध्ये या सेवेला प्रारंभदेखील झाला आहे. वेगवान इंटरनेट स्पीडमुळे सध्या नवीन 5G नेटवर्क सुविधेची जोरदार चर्चा आहे. एकीकडे ही सुविधा सुरू होत असताना, दुसरीकडे या संधीचा फायदा सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहेत. घोटाळे करणाऱ्या व्यक्ती एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया अर्थात व्हीआयचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगून फसवणूक करततात. 4G सिम 5G सिममध्ये अपग्रेड करण्यासाठी मदत करत असल्याची बतावणी करून ते ग्राहकांची फसवणूक करत आहेत. या प्रकारांपासून सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी ग्राहकांना दिला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशातल्या अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. ही नेटवर्क सेवा सुरू होताच घोटाळेबाजांनी फसवणूक करण्यासाठी नवा मार्ग अवलंबला आहे. चेक पॉइंट सॉफ्टवेअरच्या ताज्या अहवालात याविषयी उल्लेख करण्यात आला आहे. घोटाळेबाज व्यक्ती स्वतःला एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया कंपनीचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगून ग्राहकांना सिम अपग्रेड करण्यासाठी मदत करत असल्याचं सांगतात. यासाठी ग्राहकांना एक धोकादायक लिंक पाठवली जाते. त्यात युझर्सना खासगी माहिती, बॅंकेचा पासवर्ड आणि ओटीपी भरण्यास सांगितलं जात आहे. युझर्सची खासगी माहिती मिळाल्यावर घोटाळेबाज त्यांच्या बॅंक खात्यातून रक्कम लुटत आहेत. 5G नेटवर्क सुविधा सुरू होताच स्कॅम करणाऱ्यांनी फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली आहे. या पार्श्वभूमीवर चेक पॉइंट सॉफ्टवेअरने युझर्सना विशेष सल्ला दिला आहे. युझर्सनी आपल्या अकाउंटसाठी खास आणि मजबूत पासवर्ड ठेवावा. सुरक्षेसाठी एक एक्स्ट्रा लेअर म्हणून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन इनबेल करावं. लेटेस्ट सिक्युरिटी पॅचच्या मदतीनं फोन अपडेट करावा. स्कॅमशी निगडित संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. पासवर्ड कोणालाही सांगू नये. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ट्विट करून आपल्या फॉलोअर्सना 5G स्कॅमसंदर्भात माहिती दिली होती. `फसवणूक करणाऱ्या व्यक्ती ग्राहकांना 5G अपग्रेडसाठी मदत करत असल्याचं भासवत आहेत,` असं पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. हैदराबाद, पुणे आणि गुरुग्राम पोलिसांनीदेखील ट्विटर अकाउंटद्वारे असंच एक ट्विट केलं होतं. `लोकांनी कोणत्याही अपरिचित किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. आपले बॅंक डिटेल्स किंवा ओटीपी कोणासोबतही शेअर करू नयेत. असं करणं नुकसानदायक ठरू शकतं. 5Gशी संबंधित घोटाळा करणाऱ्या व्यक्ती तुमचं बॅंक अकाउंट रिकामं करू शकतात,` असा सल्ला पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून लोकांना दिला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: 5G
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात