मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोरोना काळातील धक्कादायक अहवाल समोर! करोडपतींची संख्या झपाट्याने वाढली तर..

कोरोना काळातील धक्कादायक अहवाल समोर! करोडपतींची संख्या झपाट्याने वाढली तर..

फाईल फोटो

फाईल फोटो

Wealth inequality in India: रेटिंग एजन्सी क्रेडिट सुइसने मंगळवारी ग्लोबल वेल्थ अहवाल जारी केला. त्यानुसार, भारतातील उत्पन्नाशी संबंधित डेटाचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, कोरोनाच्या काळात देशातील आर्थिक विषमता लक्षणीयरीत्या वाढली होती.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : कोरोना महामारीने जगभर हाहाकार माजवला. या काळात लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे कोलमडले आणि करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे देशातील आर्थिक विषमता वाढली होती. रेटिंग एजन्सी क्रेडिट सुइसने मंगळवारी ग्लोबल वेल्थ अहवाल जारी केला. त्यानुसार, भारतातील उत्पन्नाशी संबंधित डेटाचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, कोरोनाच्या काळात देशाची आर्थिक विषमता लक्षणीयरीत्या वाढली होती. हा दर 2020 मध्ये 82.3 टक्क्यांवर पोहोचला असून 2021 पर्यंत तो कायम राहिला.

भारतातील लोकांच्या उत्पन्नातील असमानतेशी संबंधित हा दर 2020 ते 2021 च्या अखेरीस त्याच ठिकाणी कायम राहिला. या कालावधीत देशांतर्गत मालमत्तेत मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये भारतातील एकूण संपत्ती 14.2 ट्रिलियन डॉलर होती, जी 2020 च्या तुलनेत 12% जास्त होती.

सौदी अरेबियानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर

हा अहवाल सांगतो की भारताचा गिनी गुणांक (उत्पन्नातील असमानतेशी संबंधित अभ्यास) 2000 मध्ये 74.7 वरून 2021 मध्ये 82.3 पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, अहवालानुसार, 2021 मध्ये भारताची एकूण संपत्ती 14.2 ट्रिलियन डॉलर होती, जी 2020 च्या तुलनेत 1.5 ट्रिलियन किंवा 12% जास्त होती.

वाचा - गलेलठं पगाराची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, बिझनेस, यशाच्या दिला गुरुमंत्र

जगातील इतर प्रमुख वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत चीन, इंडोनेशिया आणि सौदी अरेबियाच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर होता. सौदी अरेबिया 86.4 च्या दरासह पहिल्या स्थानावर आहे. चीन आणि इंडोनेशियासाठी गिनी गुणांक अनुक्रमे 70.1 आणि 78.2 होते, जे खूप कमी होते.

2026 पर्यंत देशातील करोडपतींची संख्या दुप्पट होईल

2021 मध्ये भारतात 107,000 करोडपतींची भर पडली असून ही संख्या एकूण जागतिक करोडपतींपैकी किमान 1% होती. अहवालानुसार, “भारतातील करोडपतींची संख्या 2026 पर्यंत दुप्पट होऊन 1.6 दशलक्षपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. 2021 मध्ये शीर्ष 1% भारतीयांच्या संपत्तीचा वाटा 0.1% ने वाढून 40.6% झाला आहे. ही संख्या सतत वाढत आहे, जी 2000 मध्ये 33.2% होती. 2020 मध्ये 6.1% घसरल्यानंतरही भारताची घरगुती संपत्ती 2021 मध्ये वाढली आहे. ही वाढ शेअर्सच्या किमतीत तीव्र 31% वाढ झाल्यामुळे झाली.

First published:

Tags: Corona, Economy