नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : कोरोना काळात उद्योगधंदे ठप्प झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी उद्योगाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे ठिकाणी कर्मचारी कपातही करण्यात आली होती. यातच आता सध्याच्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात, क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने 40 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
45 दिवसांचा पगार दिला जाणार -
कॉइनडेस्कने सूत्रांचा हवाला देऊन सांगितले की, एक्सचेंजमधील 150 कर्मचाऱ्यांपैकी एकूण 50 ते 70 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कळवण्यात आले की, त्यांना 45 दिवसांचे पगार दिले जातील आणि त्यांना आता कामावर येण्याची गरज नाही.
WazirX ने एका निवेदनात म्हटले आहे की, “सध्याच्या जागतिक आर्थिक मंदीमुळे क्रिप्टो मार्केट बियर मार्केटच्या संकटात आहे. भारतीय क्रिप्टो उद्योगाला कर, नियम आणि बँकिंग प्रवेशाबाबत समस्यांचा सामना करावा लागला आहे. यामुळे सर्व भारतीय क्रिप्टो एक्सचेंजेसमधील व्हॉल्यूममध्ये नाट्यमय घट झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी ग्राहक समर्थन, मानव संसाधन आणि इतर विभागांसह अनेक विभागांमधून कर्मचारी काढून टाकण्यात आले आहेत. तसेच व्यवस्थापक, विश्लेषक, सहयोगी व्यवस्थापक/टीम लीडर ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
हेही वाचा - ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय का? तज्ज्ञांचं उत्तर वाचा
नोकरी गमावलेल्या दुसर्या कर्मचाऱ्याच्या मते, संपूर्ण सार्वजनिक धोरण आणि संवाद टीमला काढून टाकण्यात आले होते. अहवालानुसार, WazirX चे दैनंदिन ट्रेडिंग व्हॉल्यूम 28 ऑक्टोबर 2021 रोजी 478 दशलक्ष या एका वर्षातील उच्चांकावरून 1 ऑक्टोबर 2022 रोजी 1.5 दशलक्ष पर्यंत घसरले आहे. तर काही दिवसांत ट्रेडिंग व्हॉल्यूम 10 लाखांपेक्षा कमी झाला आहे, अशी माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, Money matters