मुंबई, 25 जानेवारी: इंटरनेटवर दिवसेंदिवस ऑनलाइन स्कॅम करण्याचे (Online Scam) प्रमाण वेगाने वाढत आहे. अशातच, एक जुनी स्कॅमिंग पद्धत परत आली आहे, काही जण ऑनलाइन पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांना विविध पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच आलेल्या बातमीनुसार, पॉर्न साइट्सवरुन बनावट पॉप-अपद्वारे युजर्सना पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याने त्यांचे "ब्राउझर लॉक केले गेले आहे" (browser has been locked), असा मेसेज पाठवला जात आहे. एका सिक्युरिटी रिसर्चरने (security researcher) लोकांना याबद्दल सतर्क केले आहे. तसेच त्याने त्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये गुगल क्रोम (Google Chrome) ब्राउझरवर एक संशयास्पद URL पॉप-अप होताना दिसतंय.
इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, हा पॉप-अप मेसेज युजर्सला इशारा देतो की पॉर्न पाहिल्यामुळे त्यांचं ब्राउझर लॉक झालंय. हा पॉप-अप युजर्सना ब्राउझर अनब्लॉक करण्याच्या बदल्यात पैसे मागतो. पॉप-अप अशा प्रकारे तयार करण्यात आलंय की ते भारताच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाकडून (Ministry of Law and Justice ) बनवण्यात आल्यासारखं वाटतंय. याशिवाय युजरचं कम्प्युटर डिक्री क्रमांक 173-279 अंतर्गत "ब्लॉक करण्यात आलं आहे" असं त्यात नमूद केलेलं असतं. ते युजर्सना भारताच्या कायद्याने बंदी असलेली सामग्री पाहिल्यामुळे ब्राउझर लॉक करण्यात आल्याचा इशारा देतं.
हे वाचा-रिअल लाइफ Pushpa गजाआड! रक्तचंदनाची तस्करी करणारे 55 मजुर आणि 3 तस्कर अटकेत
तो मेसेज युजर्सना कम्प्युटर अनलॉक करण्यासाठी दंड म्हणून 29,000 रुपयांची मागणी करतो. युजर्सने दंड न भरल्यास हे प्रकरण फौजदारी कारवाईसाठी मंत्रालयाकडे हस्तांतरित केलं जाईल, असंदेखील यात सांगितलं जातं. दंड भरण्यासाठी युजरला 6 तासांचा कालावधी देण्यात येतो.
Beware of such scams where #hackers may ask you for money on the behalf of the #Ministry_of_Law_and_Justice. While browsing some websites you may get a #FullScreen Popup window and it will tell you that your PC has been locked by Ministry. Don't Pay. Check Pics... #infoSec pic.twitter.com/f2op9TmylP
— Rajshekhar Rajaharia (@rajaharia) January 24, 2022
या मेसेजमध्ये 'पेमेंट डिटेल्स' सेक्शनदेखील आहे. जिथं युजर व्हिसा किंवा मास्टरकार्ड कार्डद्वारे पेमेंट करू शकतात. पेमेंट केल्यावर लगेच ब्राउझर अनलॉक केला जाईल, असं सांगण्यात येतं. हे पूर्णपणे खोटं असून हा लोकांकडून पैसे उकळण्यासाठी खूप मोठा घोटाळा असल्याचं राजशेखर राजहरिया यांनी सांगितलं. तसेच लोकांची फसवणूक करण्यासाठी कायदा आणि न्याय मंत्रालयाचे नाव वापरणे चुकीचे आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
हे वाचा-डॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र...
भारतात पॉर्नवर बंदी असताना, बंदी घातलेल्या वेबसाइट्स पाहण्यासाठी उपाय शोधणाऱ्यांचे कॉम्प्युटर सरकारकडून ट्रॅक केले जात नाहीत. दरम्यान, जुन्या टेक्निक वापरून लोकांकडून पैसे उकळण्यासाठी सायबर स्कॅमर या पर्यायांचा वापर करत आहेत. मागच्या वर्षी जुलैमध्ये अशाच प्रकारचा घोटाळा उघडकीस आला होता, ज्यामध्ये आरोपींनी लोकांकडून 3,000 रुपयांची मागणी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Financial fraud, Porn sites, Porn video