नेल्लोर, 25 जानेवारी: विविध औषधी गुणधर्म (
Medicinal properties of Red Sandalwood) असेलल्या रक्तचंदनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी रक्तचंदनाची झाडं आहेत. विशेषत: दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात रक्त चंदन आढळतं. औषधी गुणधर्म आणि जागतिक बाजारपेठेत (
Global Market demand of sandalwood) असलेली मागणी या दोन कारणांमुळे रक्त चंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी (
Red Sandalwood smuggling) होते. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातील (
Andhra Pradesh) नेल्लोरजवळ उघडकीस आली. नेल्लोर पोलिसांनी (
Nellore Police) रक्तचंदन तस्करी विरोधात एक मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह फॉरेस्ट एरियामध्ये रक्तचंदनाची झाडं तोडणाऱ्या 55 मजुरांना आणि तीन तस्करांना पोलिसांनी पकडलं आहे. एका खबऱ्यानं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नेल्लोरजवळच्या रापूर जंगलात ही कारवाई केली.
नेल्लोरचे एसपी सीएच विजया राव (
CH Vijaya Rao) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी वेलोर दामू हा मुख्य तस्कर आहे. तो चित्तूर जिल्ह्यातील वीबीपुरम भागातील आरेगावचा रहिवासी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून पुद्दुचेरीतील कुप्पण्णा सुब्रमण्यम या व्यक्तीच्या संपर्कात होता. दामूनं आपला मेव्हणा राधाकृष्णन यालाही या तस्करीसाठी हाताशी धरलं होतं. या तीन तस्करांनी 20 जानेवारी 2022 रोजी काही मजुरांसह नेल्लोर जिल्ह्यातील गुडूर गाठलं. तिथे असलेल्या रापूरच्या जंगलात (
Rapur Forest) त्यांनी रक्तचंदनाची झाडं तोडली आणि 21 जानेवारी रोजी रात्री लाकडानं भरलेले ट्रक तमिळनाडूकडे रवाना झाले होते.
हे वाचा-TET घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, OMR शीटची पडताळणी सुरू
दरम्यान, एका खबऱ्याच्या मदतीनं पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रक्तचंदन भरलेल्या वाहनांचा शोध सुरू केला असता शनिवारी दुपारी चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर (
Chennai National Highway) दोन संशयित ट्रक आढळले. पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. पोलिसांनी लाकूडतोड करणारे मजूर व तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पथकावर दगड आणि कुऱ्हाडीनं हल्ला केला. मात्र, पोलिसांच्या पथकानं सतर्कता दाखवत 55 मजूर आणि तीन तस्करांना पकडलं. अटक केलेल्या टोळीकडून पोलिसांनी रक्तचंदनाची 45 खोडं, 24 कुऱ्हाडी, 31 मोबाईल फोन, एक टोयोटा कार आणि 75 हजार 230 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.
हे वाचा-बैल गेला अन् झोपा केला! लघवी करेपर्यंत भामट्यांनी पळवला ट्रक, नगरमधील घटना
दक्षिण भारतात चंदन आणि रक्तचंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला अल्लू अर्जूनचा (allu arjun) 'पुष्पा' (Pushpa) हा चित्रपटदेखील याच विषयावर प्रकाश टाकणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.