जाहिरात
मराठी बातम्या / मनी / महागाईनं कंबरडं मोडलं! भाजीपाल्याचे दर कडाडले, लवकरच गाठणार शंभरी?

महागाईनं कंबरडं मोडलं! भाजीपाल्याचे दर कडाडले, लवकरच गाठणार शंभरी?

महागाईनं कंबरडं मोडलं! भाजीपाल्याचे दर कडाडले, लवकरच गाठणार शंभरी?

आता अति कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर परिणाम होत आहे. वातावरण बदलाच्या फटका भाजीपाल्याला बसला आणि महाग झाला.

  • -MIN READ Washim,Washim,Maharashtra
  • Last Updated :

वाशिम : एकीकडे प्रचंड कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांवरही झाला आहे. राज्यातील बदलत्या हवामानामुळे पिकांचं नुकसान होत आहे. आधीच अतिपावसामुळे पिकांचं नुकसान झालं होतं. आता अति कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर परिणाम होत आहे. वातावरण बदलाच्या फटका भाजीपाल्याला बसला आणि महाग झाला. आधीच महागाई असताना आता भाज्यांचे दरही वाढले आहेत. वाशिममधील वातावरण बदलाचा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावल्यानं भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत.

Video : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी वर्ध्याच्या मातीत, आधुनिक शेतीतून लाखोंची कमाई!

वाशिम च्या भाजी बाजरात मेथी 20 रुपयाला जुडी तर कोबी,भेंडी, दोडकी वांगी आणि लसणाचा दर 80 प्रतिकिलो च्या वर गेला आहे. येत्या काही दिवसात भाजीपाला आणखी महाग होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाशिममधील बाजारात कोबी, भेंडी, वांगीचा दर 80 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

Farmer Loan : इंडियन बँकेची शेतकऱ्यांसाठी खास ऑफर, ऑनलाइन कर्जासह मिळणार ‘या’ सुविधा
News18लोकमत
News18लोकमत

एकीकडे सोन्याचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. याशिवाय घडभाडं महाग झालं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती बजेट तोंडावर असताना महागाई काही कमी होण्याचं नाव घेत नाही. यंदाचं बजेट हे मोदी सरकारचं शेवटचं बजेट असणार आहे. त्यानंतर 2024 मध्ये निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात