जाहिरात
मराठी बातम्या / मनी / जास्त होम लोन घ्यायचंय? या पाच पद्धती करतील तुमची मदत

जास्त होम लोन घ्यायचंय? या पाच पद्धती करतील तुमची मदत

जास्त होम लोन कसं मिळवायचं

जास्त होम लोन कसं मिळवायचं

तुम्हाला जास्त होम लोन अमाउंट घ्यायची असेल, तर असे पाच मार्ग आहेत. ज्याद्वारे तुम्ही जास्त लोन अमाउंट घेऊ शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 मे : काही काळापासून आरबीआयने रेपो रेटमध्ये अनेक वेळा वाढ केली आहे. ज्यामुळे होम लोनवरील व्याजदर पूर्वीपेक्षा जास्त झालाय. व्याजदरात वाढ झाल्यामुळे होम लोनसाठी पात्र असलेल्यांच्या संख्येतही घट झालीये. होम लोनवर जास्त रक्कम मिळण्यातही अडचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला होम लोनवर अधिक रकमेची आवश्यकता असेल, तर तुम्ही अधिक रक्कम कशी मिळवू शकता हे पाहूया.

News18लोकमत
News18लोकमत

जास्त होम लोन अमाउंट कशी मिळवायची

होम लोन मिळवण्याचे काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही जास्त अमाउंट मिळवू शकता आणि तुमचे स्वप्नातील घर खरेदी करू शकता किंवा तयार करू शकता. कर्जाची रक्कम क्रेडिट स्कोअर आणि रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते. याशिवाय बँका इतर अनेक बाबी तपासतात आणि तपासाच्या आधारे कर्जाची रक्कम दिली जाते.

क्रेडिट स्कोअर चांगला असावा

चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला स्वस्त दरात जास्त होम लोनची रक्कम मिळवून देऊ शकतो. SBI ते HDFC बँका ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारेच होम लोनची अमाउंट देतात. तज्ञांच्या मते, चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला होम लोन व्याज दर कमी करण्याची संधी देतो.

ट्रेनमध्ये विविध कोट्यातून मिळतं कन्फर्म तिकीट! असा घेता येईल फायदा

कर्जाचा कालावधी अधिक

कर्जाचा कालावधी वाढवल्याने गृहकर्जाचा EMI कमी होतो आणि तुम्हाला जास्त कर्जाची रक्कम मिळू शकते. तुम्ही बँकेला कर्जाचा कालावधी वाढवण्यास सांगू शकता.

कर्जदाराची जोड

तुम्ही तुमच्यासोबत इतर कोणाला सामील केले तर तुम्हाला जास्त लोन अमाउंट मिळू शकते. बँकेला विश्वास असतो की जास्त कर्जाची रक्कम दोन व्यक्ती परतफेड करू शकतात. तसंच, बँक दोन्ही कर्जदारांच्या पात्रतेची पडताळणी करतील.

इंटरनेट नसतानाही चालेल Google Maps, अनेकांना माहितीच नाही हा जुगाड!

डाउनपेमेंट वाढवणे

डाउनपेमेंट वाढवणे हा देखील एक चांगला मार्ग आहे. तुमच्याकडे पुरेशी बचत असल्यास, तुम्ही डाउनपेमेंट वाढवून जास्त कर्जाची रक्कम मिळवू शकता. डाउनपेमेंट केल्याने तुमचा ईएमआय कमी होईल आणि कालावधी देखील कमी होईल.

सध्याचे कर्ज कमी करा

तुमच्याकडे लोन आणि क्रेडिट कार्डचे लोन थकीत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही ते भरुन टाका. यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, ज्यावर तुम्हाला बँकेकडून कर्जाची चांगली रक्कम दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात