मुंबई, 30 ऑगस्ट : व्याजदर वाढल्याने ग्राहक आता जास्त परतावा मिळवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FDकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट एफडी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असू शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी कॉर्पोरेट एफडी योग्यरित्या निवडावे आणि केवळ ट्रिपल-ए रेट केलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी. बँकांप्रमाणेच, काही कंपन्या आणि NBFC ला देखील ठराविक कालावधीसाठी व्याजदराने लोकांकडून ठेवी गोळा करण्याची परवानगी आहे. यालाच कॉर्पोरेट मुदत ठेव म्हणतात. बँकांप्रमाणेच येथेही हमी परतावा दिला जातो. दुसरीकडे, कॉर्पोरेट एफडीवर बँकांकडून जास्त व्याज मिळते. कॉर्पोरेट एफडी घेताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. क्रेडिट रेटिंग कॉर्पोरेट एफडी घेण्यापूर्वी, तुम्ही त्या कंपनीचे क्रेडिट रेटिंग तपासणे महत्त्वाचे आहे. ज्या कंपन्यांना चांगले रेटिंग आहे ते तुम्हाला कमी व्याजदर देतील परंतु तुमचे पैसे अधिक सुरक्षित असतील. दुसरीकडे, ज्या कंपन्यांचे रेटिंग कमी आहे त्या तुम्हाला अधिक परतावा देतील. उदाहरणार्थ, ट्रिपल-ए रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट एफडी अधिक सुरक्षित असतील परंतु कमी परतावा देतील. लोकांनी अधिक सुरक्षित एफडीमध्ये गुंतवणूक करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. PF खात्यातून पैसे काढण्याची अट काय? एकावेळी किती पैसे निघतात? समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया शॉर्ट टर्म एफडी निवडा आरबीआय रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे आणि त्यामुळे व्याजदरातही सातत्याने वाढ होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अल्प मुदतीच्या एफडीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेणेकरुन ते लवकर मॅच्युअर होतील आणि जास्त परतावा मिळण्यासाठी तीच रक्कम पुन्हा एकदा नफ्यासह FD मध्ये गुंतवता येईल. FD वर कर FD चे इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न म्हणून वर्गीकरण केले जाते आणि ते कराच्या अधीन असतात. Investment Tips: वाढत्या महागाईच्या काळात कशी करायची गुंतवणूक अन् बचत? या पाच टिप्स येतील कामी डिपॉझिटमध्ये विविधता आणा तुम्ही अनेक बँका आणि कॉर्पोरेट्सकडून वेगवेगळ्या कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे पैसे अधिक सुरक्षित होतात. तुम्ही 180 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD मध्ये गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, जर तुम्हाला काही दिवसात पैशांची गरज असेल तर 15 दिवस किंवा 45 दिवसांच्या एफडीचा पर्याय देखील आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.