नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : सध्या सर्वच बँकांनी व्याजदर कमी केल्याने लोक गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. तुम्हीही त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील लोकांचे उत्पन्न वाढल्याने सध्या प्रॉपर्टी मार्केटमध्येही तेजी आहे. अलीकडील अनेक सर्वेक्षणात हे सिद्ध झालंय की घरांच्या किंवा जमिनीच्या किमतींमध्ये वाढ झाली असून ही वाढ काही वर्षे चालू राहू शकते. अशा परिस्थितीत, प्रॉपर्टी मार्केटमध्ये पैसे गुंवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मालमत्ता खरेदी विक्रीतून कोणत्याही बँकेपेक्षा जास्त नफा मिळवता येतो. प्रॉपर्टी डीलमधून अपेक्षित नफा मिळविण्यासाठी, तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जेव्हा तुम्ही रीसेलच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करण्यासाठी जाल, तेव्हा निश्चितपणे 5 गोष्टींचा विचार करा आणि मगच त्या कराराला पुढे जा. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत. मालमत्ता कुठे आहे? जेव्हा तुम्ही जमीन, घर किंवा इतर कोणत्याही प्रकारची रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी करता तेव्हा सर्वात आधी लोकेशन कुठे आहे ते तपासा. म्हणजेच त्याचे स्थान काय आहे. कोणत्याही मालमत्तेची किंमत वाढवण्यात किंवा कमी करण्यात लोकेशनची मोठी भूमिका असते. जर तुम्ही रिटर्नटच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करत असाल, तर अशा क्षेत्रात खरेदी करा जिथे वाढ होत आहे आणि वाढीची क्षमता आहे. हे तुम्हाला भविष्यात चांगले परतावा मिळण्यास मदत करेल. प्राइम एरियाच्या तुलनेत सुरुवातीला येथे गुंतवणूक देखील कमी करावी लागेल. वाचा - पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजना देतील बँक FD हून जास्त व्याज, कर बचतही होईल सुविधा मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी रुग्णालय, शाळा, उद्याने, शॉपिंग कॉम्प्लेक्स तेथून किती अंतरावर आहे ते पाहा. हे सर्व तुम्हाला चांगला परतावा मिळविण्यात मदत करतील. आता या सुविधा नसतील तर निदान भविष्यात तरी त्या तिथे बांधल्या जाण्याची शक्यता असावी. सार्वजनिक वाहतूक गुंतवणूक करताना, तुमच्या मालमत्तेपासून सार्वजनिक वाहतूक किती दूर उपलब्ध असेल हे देखील लक्षात ठेवा. जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर प्रॉपर्टीचे दर वाढतील. त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हिटी चांगली असेल. रेंटल प्रॉपर्टीज तुम्हाला भाड्याचे उत्पन्न मिळेल अशा ठिकाणी मालमत्ता खरेदी करा. तुम्ही कर्जावर मालमत्ता घेत असाल, तर दीर्घकालीन EMI तुमचे नफा नष्ट करेल. परंतु, तुम्हाला भाड्याच्या मालमत्तेमध्ये उत्पन्न मिळत राहते, ज्यामुळे ही समस्या बर्याच प्रमाणात कमी होईल. व्यावसायिक केंद्राच्या जवळ कॉर्पोरेट ऑफिसेस आणि कमर्शियल हबच्या जवळ असलेल्या मालमत्तेमुळे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. एवढेच नाही तर भाडेतत्त्वावर देऊन तुम्ही चांगला नफाही मिळवू शकता. त्याच वेळी, तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासी मालमत्ता भाड्याने देऊन नफा मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.