जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Veranda Learning Solutions IPO उद्या ओपन होणार, पैसे गुंतवण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या

Veranda Learning Solutions IPO उद्या ओपन होणार, पैसे गुंतवण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या

Veranda Learning Solutions IPO उद्या ओपन होणार, पैसे गुंतवण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या

Veranda Learning Solutions IPO: कंपनीने 200 कोटी रुपयांच्या पब्लिक ऑफरसाठी प्रति शेअर 130-137 रुपये प्राईज बँड निश्चित केला आहे. वेरांडा लर्निंग सोल्युशन्सचा आयपीओ 31 मार्चपर्यंत खुला असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च : वेरांडा लर्निंग सोल्युशन्सचा IPO (Veranda Learning Solutions IPO) उद्या म्हणजेच 29 मार्च रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. कंपनीने 200 कोटी रुपयांच्या पब्लिक ऑफरसाठी प्रति शेअर 130-137 रुपये प्राईज बँड निश्चित केला आहे. वेरांडा लर्निंग सोल्युशन्सचा आयपीओ 31 मार्चपर्यंत खुला असेल. या ऑफरमध्ये 200 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. वेरांडा लर्निंग सोल्युशन्स IPO बद्दल जाणून घेऊया » या IPO मध्ये 75 टक्के QIB साठी राखीव आहेत तर 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) तर 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. » कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. » IPO साठी केफिनटेक प्रा लि. रजिस्ट्रार आहे आणि शेअर अॅलोकेशन आणि रिफंड मॅनेज करेल. सिस्टमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लि. ऑफरसाठी मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. » लॉट साइज 100 शेअर्स आहे. गुंतवणूकदारांना किमान 13,700 रुपये गुंतवावे लागतील. » वेरांडा लर्निंग सोल्युशन्स हा कलपथी AGS ग्रुपचा अॅड-टेक वेंन्चर आहे आणि भारतभर स्टेट पीएससी, बँकिंग/स्टाफ सिलेक्शन/RRB, IAS आणि CA यासह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम ऑफर करतो. » कंपनीने 2020 मध्ये कामकाज सुरू केले. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या सहा महिन्यांत कंपनीने 15.6 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. » कंपनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन हायब्रिड आणि ऑफलाइन ब्लेंडेड फॉरमॅट स्वरूपात विविध आणि एकात्मिक शिक्षण उपाय ऑफर करते. » ब्रोकरेजनुसार, शेअर्सचे वाटप 5 एप्रिलला आणि लिस्टिंग 7 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. Uma Exports IPO आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन; प्राईज बँड, इश्यू साईज, काय करते कंपनी? वाचा सविस्तर अनलिस्टेड एरिनाचे अभय दोशी म्हणाले की, कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये व्यवसाय सुरू केला आणि त्यामुळे मूल्यांकनासाठी फारसा ट्रॅक रेकॉर्ड नाही. कंपनीने आर्थिक वर्ष 22 च्या पहिल्या सहामाहीत 15.6 कोटी रुपयांच्या महसुलावर 18.2 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला. हे क्षेत्र अजूनही उदयास येत आहे आणि खूप स्पर्धात्मक आहे कारण मोठ्या कंपन्यांकडे भरपूर कॅश उपलब्ध आहे. तोट्यात चाललेल्या कंपनीसाठी मागितलेली किंमत विक्रीच्या 25 पट आहे. प्राथमिक बाजारातील भावना कमकुवत आहेत आणि तोट्यात असलेल्या कंपन्या अलीकडच्या काळात चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात