नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: वेदांत फॅशन लिमिटेड कंपनीचा (Vedant Fashions IPO) आयपीओ लाँच होण्याची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, लवकरच या फॅशन कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. वेदांत फॅशन लिमिटेड ही, पारंपरिक कपड्यांचा ब्रँड (Traditional clothing brand) असलेल्या मान्यवरची पॅरेंट कंपनी आहे. या प्रतिष्ठित फॅशन कंपनीचा आयपीओ लाँच होण्यापूर्वी त्याबाबत माहिती जाणून घेऊया. पब्लिक इश्युतील रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, 4 फेब्रुवारी 2022 रोजी वेदांत फॅशनचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत हा आयपीओ बोलीसाठी ओपन असेल. या पब्लिक ऑफरमधून कंपनीनं 3 हजार 149.19 कोटी रुपये मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. काय असेल प्राइस बँड? 824 रुपये ते 866 रुपये प्रति इक्विटी शेअर (Equity shares) असा इश्यु निश्चित करण्यात आला आहे. मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये (Grey Market) वेदांत फॅशनचे शेअर्स 42 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. हे वाचा- Gold Price Today: बजेटनंतर आज सोने दरात घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा आजचा भाव Vedant Fashions IPO विषयी वाचा सर्वकाही 1. वेदांत फॅशन आयपीओ GMP: मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये वेदांत फॅशनचे शेअर्स 42 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. ही किंमत कालच्या 35 रुपयांच्या ग्रे मार्केट प्रीमियमपेक्षा 7 रुपयांनी जास्त आहे. 2. आयपीओ प्राईज: कंपनीनं आपला आयपीओ इश्यु (IPO Issue) 824 रुपये ते 866 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केला आहे. 3. सबस्क्रिप्शन स्टेट्स : वेदांत फॅशनचा आयपीओ 4 फेब्रुवारी 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन होईल आणि 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यावर बोली लावता येणार आहे. 4. आयपीओ साइझ: या आयपीओमधून 3 हजार 149.19 कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. 5. लॉट साइझ: गुंतवणूकदार या आयपीओसाठी लॉटमध्ये अर्ज करू शकतात. एका लॉटमध्ये कंपनीचे 17 शेअर्स उपलब्ध असतील. 6. अॅप्लिकेशन लिमिट : गुंतवणूकदार कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करू शकतात. हे वाचा- Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेल दर जारी, मुंबईत किती आहे आजचा भाव 7. किमान गुंतवणुकीची मर्यादा : मान्यवर आयपीओसाठी (Manyavar IPO) अर्ज करण्यासाठी किमान 14 हजार 722 (866 x 17) इतकी रक्कम आवश्यक असेल तर पब्लिक इश्युमध्ये जास्तीत जास्त एक लाख 91 हजार 386 (866 x 17) x 13 इतक्या गुंतवणुकीची परवानगी आहे. 8. अलॉटमेंट तारीख : पब्लिक इश्युचं शेअर वाटप 11 फेब्रुवारी 2022 रोजी होण्याची शक्यता आहे. 9. लिस्टिंग : वेदांत फॅशनचे शेअर्स एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध केले जातील. 10. लिस्टिंग डेट : मान्यवरचे शेअर्स 16 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. तुम्हीदेखील वेदांत फॅशन्समध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर वरील तपशीलांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.