जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेचं दिवाळं, भारतीय स्टार्टअपवर काय होणार परिणाम?

अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेचं दिवाळं, भारतीय स्टार्टअपवर काय होणार परिणाम?

अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेचं दिवाळं, भारतीय स्टार्टअपवर काय होणार परिणाम?

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेल्या 48 तासांपासून अस्वस्थता आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या घसरणीमुळे बँक व्यवस्थापनाचीच नव्हे तर अमेरिकन सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

अंकित त्यागी प्रतिनिधी, नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे. त्यातही अमेरिकेत शेअर मार्केट आणि बँकांची अवस्था अगदीच बिकट आहे. जगातील सर्वात मोठी बँक समजल्या जाणाऱ्या बँकेचं दिवाळं निघालं आहे. ही बँक बंद होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता तिथल्या आणि पर्यायाने भारतातील उद्योगावर याचा कसा परिणाम होणार ते थोडं गणित समजून घेऊया. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेल्या 48 तासांपासून अस्वस्थता आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या घसरणीमुळे बँक व्यवस्थापनाचीच नव्हे तर अमेरिकन सरकारचं टेन्शन वाढलं आहे. कॅलिफोर्नियामधील SVB बँक बंद केली आणि त्याचं नियंत्रण यूएस फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) कडे सोपवले. CNBC आवाजने दिलेल्या माहितीनुसार, स्टार्टअप्सनी त्यांचे पैसे बँकेतून काढण्याबाबत विचार सुरू केला आहे. बंद होण्यापूर्वी, SVB ही यूएस मधील 16 वी सर्वात मोठी बँक होती, जी कॅलिफोर्निया आणि मॅसॅच्युसेट्समध्ये एकूण 17 शाखा चालवत होती. बँकेची मालमत्ता $209 अब्ज आणि ठेवी $175.4 अब्ज होती. यामुळे अनेक स्टार्टअप कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न आणि इतर खर्च कसे भागवायचे हा प्रश्न समोर आहेत. सध्या ते आपल्या कर्मचाऱ्यांना येत्या ३० दिवसांत पगार देण्याच्या स्थितीत नाहीत.

अमेरिकेतील स्टार्टअपसोबत भारतातील ही काही स्टार्टअप किंवा ज्यांनी भारतात गुंतवणूक केलीय अशा कंपन्यांना धोका आहे. पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होणार असल्याने सध्या भीतीचं वातावरण आहे. सध्या भारतीय स्टार्टअप्सवर SVB कोसळल्याचा परिणाम निश्चित करणे कठीण आहे असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. अमेरिकेतील भारतीय कंपन्यांना या घसरणीचा फटका बसू शकतो. भारतातील स्टार्टअपवर थेट आणि मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात