मराठी बातम्या /बातम्या /मनी /

UPI Transaction Limit : तुम्ही UPI पेमेंट करता का? ट्रांजॅक्शन लिमिटबद्दल तुम्हाला माहितीय? वाचा सविस्तर

UPI Transaction Limit : तुम्ही UPI पेमेंट करता का? ट्रांजॅक्शन लिमिटबद्दल तुम्हाला माहितीय? वाचा सविस्तर

देशी पेमेंट सिस्टीमचा विदेशात वाजणार डंका! अमेरिकेतही सहजपणे करता येणार UPI Payment

देशी पेमेंट सिस्टीमचा विदेशात वाजणार डंका! अमेरिकेतही सहजपणे करता येणार UPI Payment

सर्वात सोपं आणि सोयीस्कर वाटणाऱ्या या UPI पेमेंटबद्दल अनेक लोकांना काही गोष्टी माहित नसतात. खरंतर UPI पेमेंट करताना तुमची बँक तुमच्यावरील व्यवहारावर मर्यादा घालते हे तुम्हाला माहीत आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 25 सप्टेंबर : कोरोनाकाळानंतर देश डिजिटाइजेशनकडे वळला आहे. ज्यामुळे आता बहुतांश लोक हे ऑनलाईन व्यवहार मोठ्याप्रमाणत करु लागले आहेत. ज्यामध्ये पैसे पाठवणे असो किंवा मग वस्तू मागवणं, गाडी बूक करणं गोष्टी घरबसल्या एका क्लिकवर होऊ लागल्या. या सगळ्यात लोकप्रिय ठरलं ते म्हणजे UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस. याचा वापर करुन तुम्ही कुठे ही कोणालाही आणि कितीही पैसे पाठवू शकता. अगदी भाजी किंवा किराणामालासाठी देखील तुम्ही अगदी मिनिमम रक्कम 1 रुपयापासून पैसे ट्रान्सफर करु शकतात. ज्यामुळे लोकांकडून याचा वापर मोठ्याप्रमाणावर होऊ लागला आहे. म्हणूनच तर कमी वेळेत UPI खूपच प्रसिद्ध झाले.

ऑगस्ट महिन्याच्या अहवालानुसार, देशात प्रथमच UPI व्यवहारांची संख्या 650 कोटींच्या पुढे गेली आहे. एका वर्षात व्यवहारांच्या संख्येत 85% वाढ झाली आहे. व्यवहारांच्या मूल्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

सर्वात सोपं आणि सोयीस्कर वाटणाऱ्या या UPI पेमेंटबद्दल अनेक लोकांना काही गोष्टी माहित नसतात. खरंतर UPI पेमेंट करताना तुमची बँक तुमच्यावरील व्यवहारावर मर्यादा घालते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही UPI सह एका मर्यादेपर्यंतच पेमेंट करू शकता. हो हे खरं आहे आणि तुम्हाला ग्राहक म्हणून याबाबत काही गोष्टी माहित असाव्यात. चला त्या समजून घेऊ.

प्रत्येक बँक UPI व्यवहारांसाठी दैनंदिन मर्यादा ठेवते. म्हणजेच, तुम्ही एका दिवसात ठराविक रकमेपर्यंतच पैसे पाठवू किंवा मिळवू शकता. इतकेच नाही तर एकावेळी किती पैसे UPI वरुन पाठवू शकतात यावर वेगवेगळ्या बँका त्यांचे वेगवेगळे चार्जेस असतात.

SBI बँक UPI व्यवहार मर्यादा

SBI च्या UPI व्यवहार मर्यादेत नवीन वापरकर्त्यांसाठी 24 तासांसाठी 5 हजार रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर इतर लोकांना UPI व्यवहाराची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत आहे.

ICICI बँक UPI व्यवहार मर्यादा

ICICI बँकेने आपल्या वापरकर्त्यांसाठी UPI ची व्यवहार मर्यादा 10 हजार रुपये ठेवली आहे. दैनंदिन मर्यादा देखील प्रति वापरकर्ता 10 हजार रुपये आहे. तथापि, जर तुम्ही Google Pay अॅपद्वारे पैसे देत असाल, तर ही मर्यादा तुमच्यासाठी 25 हजार रुपये असेल.

HDFC बँक UPI व्यवहार मर्यादा

HDFC ग्राहक 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार किंवा एका दिवसात 10 व्यवहारांना अधिकृत करू शकतात. येथे लक्षात ठेवा की 10 व्यवहारांची मर्यादा केवळ निधी हस्तांतरणावर आहे. तुम्ही कोणतेही बिल पेमेंट केल्यास किंवा व्यापारी व्यवहार केल्यास ते त्यात गणले जाणार नाहीत.

UPI द्वारे IPO अर्जावर प्रति व्यवहार 5 लाख रुपयांची मर्यादा आहे.

नवीन ग्राहक किंवा नवीन UPI ​​वापरकर्ते ज्यांनी त्यांचे डिव्हाइस/सिम कार्ड/मोबाईल क्रमांक बदलला आहे, ते पहिल्या 24 तासांत फक्त 5 हजार पर्यंत व्यवहार करू शकतात. तर आयफोन वापरकर्त्यांसाठी, ही मर्यादा 72 तास आहे.

First published:

Tags: Money, Online, Online payments, Upi