बजेटमध्ये करदात्यांना मिळू शकते 'ही' मोठी सवलत

Union Budget, Nirmala Sitaraman, Modi - सर्वेत सामील असलेल्या 74 टक्के लोकांनी आपली मतं मांडली

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 09:13 PM IST

बजेटमध्ये करदात्यांना मिळू शकते 'ही' मोठी सवलत

मुंबई, 01 जुलै : शुक्रवार 5 जुलैला मोदी सरकारचं पूर्ण बजेट सादर होतंय. यावेळी वैयक्तिक करदात्यासाठी कर सवलतीची मर्यादा 2.5 लाख रुपयाच्या पुढे जाऊ शकते. यासोबत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळकत असलेल्यांना 40 टक्क्यांच्या वरच्या दरानं इन्कम टॅक्स बसू शकतो. केपीएमजीच्या एका सर्वेमध्ये हे समोर आलंय.

केपीएमजी ( इंडिया )च्या 2019-20च्या सर्वेत वेगवेगळ्या उद्योगांच्या 226 लोकांचा विचार केला गेलाय. सर्वेत सामील असलेल्या 74 टक्के लोकांनी आपली मतं मांडली. त्यात असं म्हटलं की वैयक्तिक इन्कम टॅक्समध्ये सवलत ही 2.5 लाख रुपयांच्या पुढे वाढवली जावी. तर 58 टक्के लोकांचं म्हणणं होतं की सरकारनं 10 कोटी रुपयांहून जास्त कमाई करणाऱ्या सुपर रिच लोकांवर 40 टक्के कर लावू शकते.

खुशखबर, सोनं 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

Inheritance Tax परत घेण्याची शक्यता

सर्वेमध्ये 13 टक्के लोकांचं म्हणणं होतं की Inheritance Tax परत घेता येऊ शकतो. 10 टक्क्यांनी सांगितलं वेल्थ टॅक्स -इस्टेट शुल्क पुन्हा लागू करता येईल.

Loading...

देशातल्या 'या' मोठ्या खाजगी बँकेनं दिली ग्राहकांना भेट, स्वस्त झालं EMI

रियल सेक्टरमधली मंदी संपवण्याचा प्रयत्न

मोदी सरकारला रियल इस्टेट सेक्टरमधली मंदी संपवायची आहे. म्हणून बजेटमध्ये ठोस पावलं उचललेली दिसू शकतात. याच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अर्थ मंत्रालय विचार करतंय. या पर्यायांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात आणि प्रिन्सिपलवर कर सवलत वाढवली जाऊ शकते. आता ती किती वाढवली जाईल, याचे विविध मार्ग असू शकतात.

नागपूर युनिव्हर्सिटीत 117 पदांवर भरती, 'या' उमेदवारांना संधी

डायरेक्ट टॅक्समध्ये फार बदल नाहीत

53 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामण 5 जुलै रोजी सादर होणाऱ्या बजेटमध्ये थेट करात फार बदल करतील असं वाटत नाही.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...