मुंबई, 9 जुलै: इक्विटीमध्ये गुंतवणुकीच्या (Investment) दृष्टीकोनातून म्युच्युअल फंडांना नेहमीच कमी जोखमीचे मानले जाते. परंतु म्युच्युअल फंड (Mutual Funds) अनेक प्रकारच्या जोखमींशी संबंधित असतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी धोकायदायक ठरु शकते. त्यामुळे म्युच्युअल फंडातील धोके ओळखले पाहिजेत. अनसिस्टमॅटिक रिस्क एकाच कंपनी किंवा क्षेत्राशी संबंधित ही जोखीम आहे. याची अनेक कारणे असू शकतात. सरकारच्या वतीने कोणत्याही उद्योगासाठी व्यवसायाशी संबंधित नियम बदलणे. बाजारात नवीन स्पर्धक कंपनीचे आगमन होणे. सरकारकडून कंपनीला त्यांचे उत्पादन परत मागवण्यास भाग पाडणे. कंपनीचा आर्थिक घोटाळा, अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले पाहिजेत. जेणेकरुन कधी अशा जोखमीचा सामना करावा लागला तर त्याचा तुमच्या पोर्टफोलिओवर कमीत कमी परिणाम झाला पाहिजे. उंच इमारतीत कोणत्या मजल्यावर घेणे तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर, वाचा फायदे-तोटे सिस्टमॅटिक रिस्क सिस्टमॅटिक रिस्क केवळ म्युच्युअल फंडावरच नाही तर संपूर्ण शेअर बाजाराला प्रभावित करते. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. हे कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, युद्ध, दहशतवादी हल्ल्यामुळे होऊ शकते. ही जोखीम टाळण्यासाठी, तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा कालावधी नेहमीच लांब ठेवावा. LIC Scheme : दररोज फक्त 125 रुपये जमा करा, 27 लाख रुपये मिळतील; एलआयसीची दमदार योजना बिहेविअर रिस्क ही मॅनेजर आणि गुंतवणूकदार या दोघांमुळे असू शकते. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. परंतु काहीवेळा या जोखमीमुळे, गुंतवणूकदार त्याचे संपूर्ण भांडवल देखील जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने फंड विकत घेतल्यास आणि तोटा झाल्यास त्याचे नुकसान कालांतराने वाढत जाते. हे टाळण्याचा सर्वात यशस्वी मार्ग हा आहे की तुम्ही स्टॉक असो किंवा म्युच्युअल फंड, हमी स्टॉप लॉससह ट्रेड केला पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.