मुंबई, 1 एप्रिल : पेट्रोल-डिझेलचे दिवाळीपासून स्थिर असलेले दर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर हळूहळू वाढू लागले. काही पैशांनी दररोज वाढणाऱ्या दरामुळे आता हळूहळू सर्वसामान्यांच्या खिशावर भार येऊ लागला आहे. गेल्या 10 दिवसांपासून इंधनाच्या दरात (Fuel Price Hike) सातत्याने वाढ होत आहे. हेच कारण पुढे करत ऑनलाईन अॅप बेस उबरने (Uber Taxi) भाडेवाढ जाहीर केली आहे. ही भाडेवाढ सध्यातरी मुंबईपूरती मर्यादित आहे. मात्र इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर आणखी भाडेवाढ करण्याचं सुतोवाचही कंपनीने दिलं आहे.
Uber मुंबईतील कॅबचे भाडे 15 टक्क्यांनी वाढवत आहे अशी घोषणा उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे सेंट्रल ऑपरेशन्सचे प्रमुख नितीश भूषण यांनी केली आहे. ते म्हणाले की भाड्यात वाढ ही इंधनाच्या किमतीतील वाढीच्या परिणामापासून ड्रायव्हर्सना मदत करण्यासाठी होत आहे. आम्ही ड्रायव्हर्सचा म्हणणं ऐकतो आणि समजून घेतो. इंधनाच्या किमतींमध्ये होत असलेली सध्याची वाढ चिंतेचे कारण आहे. येत्या काही आठवड्यात इंधनाच्या किमतींचा मागोवा घेणे सुरू ठेऊ आणि आवश्यकतेनुसार पुढील पावले उचलली जातील, असंही नितीश भूषण यांनी म्हटलं.
App-based cab firm Uber says it has raised fares by 15 per cent for travel in Mumbai to offset impact of rising fuel prices
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2022
सामान्यांच्या खिशाला चाप! National Highway वर टोल टॅक्स वाढल्याने आजपासून किती मोजावी लागणार रक्कम?
दहा दिवसात इंधन दरात सातत्याने वाढ
गेल्या 10 दिवसांपासून इंधनाच्या दरात (Fuel Price Hike) सातत्याने वाढ होत आहे. तेल कंपन्यांनी गेल्या 10 दिवसात पेट्रोलच्या दरात 6.40 रुपयांची वाढ केली आहे, तर डिझेलच्या किमतीही साधारण एवढ्याच वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसात दररोज साधारण 80 पैशांनी इंधनाचे दर वाढत होते. मुंबईत आज पेट्रोल 116.72 रुपयांना विकले जात आहे. तर डिझेल 100.94 रुपयांना विकले जात आहे.
सिलेंडरच्या दरातही वाढ
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ झाल्याने मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमसाठीचा हा दर आता 2,205 रुपयांवर पोहोचला आहे, याआधी दर 1,955 रुपये होता. दिल्लीमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. 1 मार्च रोजी याठिकाणी दर 2,012 रुपये होता, 22 मार्च रोजी जेव्हा या दरात घसरण झाली होती त्यावेळी किंमत 2,003 रुपयांवर पोहोचली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel price, Taxi