जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ज्याची भीती होती तेच घडतंय, ट्विटरमधील 2 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

ज्याची भीती होती तेच घडतंय, ट्विटरमधील 2 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

शुक्रवारीपासून कर्मचाऱ्यांची कपात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ट्वीटरसोबतचा करार यशस्वी झाल्यानंतर एलन मस्क यांनी अनेक नियम नियम आणि बदल करायला सुरुवात केली आहे. ज्याची भीती होती अखेर तेच घडलं आहे. ट्वीटरमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. 7 दिवस 12 तास काम करण्याचे आदेश एलन मस्क यांनी दिले होते. शुक्रवारीपासून कर्मचाऱ्यांची कपात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म फायदेशीर करण्यासाठी एलन मस्क यांनी निर्णय घेतला आहे. ट्वीटरची एकूण कर्मचारी संख्या साधारण 7500 हून अधिक आहे. त्यापैकी साधारण 2 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना काढण्यात येईल अशी माहिती एलन मस्क यांनी आधीच इ मेलद्वारे दिली होती. पहिल्या टप्प्यात साधारण 2 हजार कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेलं वर्क फ्रॉम होम या पॉलिसीमध्ये देखील बदल करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करावं लागण्याची शक्यता आहे.

Twitter चं Blue Tick आता नाही मिळणार फुकट; मोजावी लागणार एवढी मोठी रक्कम

जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटरसोबतच्या करारनंतर त्याची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास आजपासून सुरुवात केली आहे. मस्क यांना कंपनीच्या पायाभूत सुविधांचा खर्च कमी करून सुमारे 1 अब्ज 82 अब्ज डॉलरची बचत करायची आहे. कर्मचाऱ्यांना काही काळासाठी 12 तास काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ट्वीटरचे खर्च आटोक्यात आणण्याबाबत सध्या प्लॅन सुरू आहे. येत्या काळात अनेक बदल देखील होऊ शकतात.

12 तास आणि आठवड्याचे 7 दिवस काम, ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी नव्या बॉसनं कडक केले नियम
News18लोकमत
News18लोकमत

एलन मस्क यांनी ट्वीटर आपल्याकडे घेतल्यानंतर सर्वात पहिला बदल हा ब्लू टिकमध्ये केला. आधी फ्री असलेलं ब्लू टिक आता मिळणार नाही. तर आता त्यासाठी दर महिन्याला 600 हून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय त्यांनी ट्वीटरचे आधीचे CEO पराग अग्रवाल यांनाही पदावरून हटवलं आहे. अनेक बदल सध्या सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात 2 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात