मुंबई : ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी आता तुमचा खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागणार आहे. ट्विटरचे नवे CEO एलन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्विटरवर ब्लूक टिकसाठी महिन्याला आता मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. याबाबत एलन मस्क यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.
ट्विटरचे नवे CEO एलन मस्क यांनी ट्विट करून ब्लू टिकसाठी शुल्क द्यावे लागणार असल्याचं सांगितलं आहे. महिन्याला 8 डॉलर मोजावे लागणार आहेत. एलन मस्क यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, आता ब्लू टिकसाठी युजर्सना दर महिन्याला 8 डॉलर मोजावे लागणार आहेत.
महिन्याला 8 डॉलर म्हणजे 12 महिन्यांचे 96 डॉलर्स होतात. जवळपास 12 महिन्यांचा विचार केला तर 7927.87 रुपये होतात. यामध्ये आणखी एक रिस्क म्हणजे डॉलरचं मूल्य वाढलं तर भारतीयांना ब्लू टिकसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
एलन मस्कने Twitter बोर्डवरील सर्व डायरेक्टर्स हटवले, स्वतःच्या हाती घेतली सूत्रे
प्रत्येक देशासाठी हे पैसे कमी जास्त असू शकतात. त्या देशातील लोकांच्या क्रयशक्तीवर आणि खरेदीची क्षमता लक्षात घेऊन तसं नियोजन करण्यात येईल असं एलन मस्क यांनी म्हटलं आहे. याआधी ब्लू टिकसाठी २० डॉलरवर चर्चा झाली होती.
प्रत्येक महिन्याला युजरला 8 डॉलर साधारणपणे 660 रुपये महिन्याला द्यावे लागणार आहेत. यामध्ये पुन्हा कमीजास्त होण्याची शक्यता असल्याचंही एलन मस्क यांनी म्हटलं आहे. आता हा नियम प्रत्येक देशासाठी सध्यातरी लागू करण्यात आला आहे. मात्र अजून काही बदल होणार का? याबाबत लवकरच माहिती मिळू शकते.
ब्लू टिकच्या चार्जवर मस्क यांना यासाठी युजर्सकडून दरमहा 20 डॉलर आकारण्यात येणार आहेत. याबाबत जगभरात चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर विविध कमेंट्स आल्या. या निर्णयानंतर मस्क यांनी सोमवारी त्याची किंमत कमी केली आणि आता दरमहा 20 ऐवजी फक्त 8 डॉलर द्यावे लागतील, असे सांगितले. याआधी ब्लू टिक ट्विटरवर फ्री होतं.
ट्विटरच्या CEO पदावरुन काढल्यास पराग अग्रवाल यांना मिळणार 325 कोटींची भरपाई, काय आहे कारण?
Twitter’s current lords & peasants system for who has or doesn’t have a blue checkmark is bullshit.
Power to the people! Blue for $8/month. — Elon Musk (@elonmusk) November 1, 2022
ब्लू टिकसाठी ज्या युजरने 8 डॉलर मोजले आहेत. त्यांना चांगल्या सुविधांचा लाभ देखील घेता येणार आहे. उत्तर, सर्च आणि उल्लेख यामध्ये ब्लू टिक लोकांना प्राधान्य दिले जाईल. या युजर्सना मोठे व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. जाहिरातीही पूर्वीपेक्षा निम्म्याच असतील.
ब्लू टिक म्हणजे हे अकाउंट व्हेरिफाइड आहे असं समजलं जातं. युजर्सला किंवा कंटेंट क्रिएटर्सला महिन्याला रिवॉर्ड्स देखील मिळणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे. एलन मस्क यांनी पुढे लिहिले की, पेवॉलच्या माध्यमातून पब्लिशर्सना आमच्यासोबत काम करण्याची संधी देखील दिली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Twitter, Twitter account, Twitter War