मराठी बातम्या /बातम्या /मनी /Twitter चे CEO 2 कोटीत विकणार आपलं पहिलं ट्वीट, वाचा नेमकं काय लिहिलं होतं

Twitter चे CEO 2 कोटीत विकणार आपलं पहिलं ट्वीट, वाचा नेमकं काय लिहिलं होतं

डोरसीनं शनिवारी आपलं 6 मार्च 2006 चं पहिलं ट्वीट क्रिप्टोकरंसीच्या रुपात विकण्याची (Twitter CEO Puts up First Tweet For Sale) घोषणा केली आहे. डोरसी यांच्या या ट्वीटसाठी आतापर्यंत 2,67,000 डॉलरची बोली लागली आहे.

नवी दिल्ली 06 मार्च : ट्वीटरचे सीईओ जैक डोरसी यांचे ट्वीट (Twitter) आता विकण्यासाठी तयार आहेत. जैक डोरसी (Jack Dorsey) यांनी स्वतः याबद्दलची घोषणा केली आहे. डोरसीनं शनिवारी आपलं 6 मार्च 2006 चं पहिलं ट्वीट क्रिप्टोकरंसीच्या रुपात विकण्याची (Twitter CEO Puts up First Tweet For Sale) घोषणा केली आहे. डोरसी यांच्या या ट्वीटसाठी आतापर्यंत 2,67,000 डॉलरची बोली लागली आहे. डोरसी यांचं 15 वर्षांपूर्वीच हे ट्वीट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध ट्वीटपैकी एक आहे. या डिजीटल मेमरीसाठी कितीही किंमत मोजण्यासाठी बोली लावणारे आकर्षित होऊ शकतात. या ट्वीटची आतापर्यंतची सर्वाधिक बोली 100,000 डॉलर म्हणजेच जवळपास 73.1 लाख इतकी लागली आहे.

काय होतं डोरसी यांचं पहिलं ट्वीट -

जैक डोरसी यांचं पहिलं ट्वीट 6 मार्च 2006 चं आहे. यात डोरसी यांनी लिहिलं, की जस्ट सेटिंग अप माय ट्विटर ("just setting up my twttr"). डोरसीनं शनिवारी एक लिंक ट्वीट केली यामध्ये ट्वीट खरेदीसाठीची बोली प्रक्रिया सुरू होती. वॅल्यूएबल्सच्यानुसार, आपण जे खरेदी करत आहात ते ट्वीटचं एक डिजीटल सर्टिफिकेट आहे. हे वेगळं आहे, कारण याला निर्मात्याद्वारे हस्ताक्षरित आणि प्रमाणित केलं गेलं आहे.

कुठे विकले जाणार ट्वीट -

डोरसीचं पहिलं ट्वीट NFT वर विकलं जाईल. NFT म्हणजे नॉन-फंजिबल टोकन. NFT एथेरियम ब्लॉकचेनवर एक डिजीटल टोकन आहे. हे यूनिक डिजीटल वस्तुंना खरेदीची आणि विक्रीची परवानगी देतं आणि ब्लॉकचेनचा वापर करणाऱ्या लोकांचा रेकॉर्ड ठेवतं. एका ट्वीटच्या खरेदीदाराला एक ऑटोग्राफ्ड डिजीटल सर्टिफिकेट मिळेल. याला क्रिप्टोग्राफीचा वापर करत हस्ताक्षरित केलं गेलं असेल. यात व्हॅल्यूएबल वेबसाईटनुसार मूळ ट्वीटचे मेटाडेटा सामील असेल. ट्वीट ट्विटरच्या वेबसाईटवरही उपलब्ध असले.

First published:

Tags: Tweet, Twitter, Twitter account