यंदा पंढरीच्या वारीत सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशिन्स

यंदा पंढरीच्या वारीत राज्य महिला आयोगातर्फे 'नारीशक्ती चित्ररथ' असणार आहे. या माध्यमातून दिंडीत सहभागी झालेल्या महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 08:23 PM IST

यंदा पंढरीच्या वारीत सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशिन्स

पुणे, 26 जून- यंदा पंढरीच्या वारीत राज्य महिला आयोगातर्फे 'नारीशक्ती चित्ररथ' असणार आहे. या माध्यमातून दिंडीत सहभागी झालेल्या महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. पालखीच्या दोन्ही मार्गांवर चित्ररथांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशिन्स आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इनसिनेटर मशिन्स असतील.सॅनिटरी नॅपकिन्स वापराबाबत आणि पर्यायाने मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृती करण्याचा उद्देश असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 27 जून (गुरुवारी) रोजी पुण्यात शनिवारवाडा येथे सकाळी 10 वाजता या संदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, डॉ. सदानंद मोरे, महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार असल्याची माहिती विजया रहाटकर यांनी दिली.

अभिनेत्री तनुश्री दत्ताबाबत काय म्हणाल्या विजया रहाटकर

अभिनेता नाना पाटेकर यांना मीटू (Metoo)प्रकरणी पोलिसांनी दबावाखाली क्लीन चिट दिल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला होता. या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,तनुश्री हिने मध्यस्थामार्फत तक्रार पाठवली होती. तरी देखील आम्ही तिच्या तक्रारीची दखल घेवून संबंधितांना नोटीसाही पाठवल्या. परंतु

तनुश्रीने स्वतः आली नाही. तिने यायला हवं होतं. मात्र, तनुश्री फिरकली नाही, असं रहाटकर यावेळी म्हणाल्या. तनुश्री दत्ता हिच्याकडून आम्हाला त्या प्रकरणाविषयी माहिती जाणून घ्यायची होती, असेही रहाटकर यावेळी म्हणाल्या.

Loading...

काय आहे MeToo प्रकरण?

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याशी हॉर्न ओके प्लिजच्या सेटवर गैरवर्तन केल्याप्रकरणी नाना पाटेकर यांना क्लिन चिट मिळाली आहे. या प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीचा अहवाल अंधेरी न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र पोलिसांना नाना पाटेवर यांच्या विरोधात कोणताही ठेस पुरावा न सापल्यानं नाना पाटेवर यांना आता दिलासा मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी तनुश्री दत्तानं MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लिज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धातीनं स्पर्श केल्याचं तनुश्रीनं म्हटलं होतं. या सिनेमात आयटम साँग तनुश्री करत होती मात्र तिला या गाण्यातील काही स्टेपवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सिनेमाच्या सेटवर प्रचंड गोंधळ माजला होता. त्यानंतर तनुश्री या सिनेमातून माघार घेतली आणि ती परदेशात निघून गेली. मात्र मागील वर्षी भारतात परतल्यावर तिनं नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली मात्र पोलिस तपासात हे सर्व आरोप कमकुवत असल्याचं तसेच नाना पाटेकर यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं दिसून आलं त्यामुळे नाना पाटेकर यांना आता दिलासा मिळाला आहे.

VIDEO: ...आणि चिमुकलीनं दिली विठुरायाची शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...