बब्बू शेख, मनमाड : महागाईच्या दरात थोडी घट झाली आहे. तर दुसरीकडे जेवणाची चव वाढवणारा टोमॅटो स्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहे. आधीच पावसामुळे झालेलं मोठं नुकसान आणि आता टोमॅटोला मिळणार कमी भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मनमाडला 20 किलोच्या एका कॅरेटला 175 ते 180 रुपये इतकाच भाव मिळत आहे. कर्ज घेऊन शेतात पिकवलेल्या टोमॅटोवर आधीच पावसानं नजर लावली. आता मार्केटमध्ये टोमॅटोला योग्य भावही मिळेनासा झाला आहे.
Wardha : पारंपारिक शेतीला फाटा देत रेशीमधून मिळवलं लाखोंच उत्पन्न, पाहा Videoकष्टाने पिकविलेला टोमॅटोला प्रति किलो 7 ते 8 रुपये भाव मिळत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. बाजार समित्यात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. ही परिस्थिती जरी ग्रामीण भागातली असली तर प्रत्यक्षात शहरात वेगळी स्थिती आहे.
भन्नाट! दिव्यांग व्यक्तीनं खराब फ्रिजचा वापर करुन बनवलं हॅचिंग मशीन, Videoमुंबई, पुण्यासारख्या शहरात आज ही नागरिकांना चढ्या भावाने टोमॅटो विकत घ्यावा लागत आहे. एका प्रकारे दलाल ग्राहकांची लूट करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांना पैसे कसे मिळणार असा प्रश्न त्यांना सतावत आहे.