Home /News /money /

1 कोटीहून अधिक पेन्शनर्ससाठी खुशखबर; आता घरबसल्या बनवा लाईफ सर्टिफिकेट

1 कोटीहून अधिक पेन्शनर्ससाठी खुशखबर; आता घरबसल्या बनवा लाईफ सर्टिफिकेट

टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने पेन्शनधारकांसाठी एक बायोमेट्रिक आधारित डिजिटल सेवेची सुरुवात केली आहे. पोस्टमन घरातच केवळ पाच मिनिटात बायोमेट्रिकद्वारे लाईफ सर्टिफिकेट तयार करून देईल.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : पेन्शनधारकांना त्यांचं पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाण पत्र देणं आवश्यक असतं. पण आता त्यासाठी कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. आता घरबसल्या जीवन प्रमाण पत्र मिळू शकतं. कोरोना काळात सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी या नियमात सूट दिली आहे. यावर्षी सर्व पेन्शनधारक 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या 2 महिन्यांपर्यंत लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतात. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. अपंग आणि वृद्धांसाठी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही. इंडियन पोस्टल पेमेंट बँक घरपोच सुविधा देत आहे. जवळच्या पोस्टमनशी संपर्क साधून, त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी पोहचेल आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवेल. सेवानिवृत्त वृद्ध कर्मचारी असल्यास, चालण्या-फिरण्यास असमर्थ असल्यास, पेन्शनसाठी द्यावं लागणारं लाईफ सर्टिफिकेट बनवण्यासाठी कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही. टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने पेन्शनधारकांसाठी एक बायोमेट्रिक आधारित डिजिटल सेवेची सुरुवात केली आहे. पोस्टमन घरातच केवळ पाच मिनिटात बायोमेट्रिकद्वारे लाईफ सर्टिफिकेट तयार करून देईल. घरबसल्या पाच मिनिटात बनवा जीवन प्रमाणपत्र - केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्थांचे पेन्शनधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुमच्या बोलवण्यानुसार, पोस्टमन घरी पाच मिनिटात बायोमेट्रिक जीवन प्रमाणपत्र काढून देईल. यासाठी 70 रुपये भरावे लागतील. लाईफ सर्टिफिकेटसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. पेन्शनधारकांकडे आधार नंबर असणं गरजेचं असून त्याशिवाय पीपीओ नंबर, मोबाईल नंबर पोस्टात द्यावा लागेल. पोस्टमन आधारच्या माध्यमातूनच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकेल आणि त्यानंतर ते पेन्शन जारी करणाऱ्या संबंधित विभाग किंवा बँकेत अपडेट होईल. लाईफ सर्टिफिकेट हे पेन्शनधारकाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. हे जमा न केल्यास पेन्शन मिळणं बंद होऊ शकतं. परंतु सध्या केंद्र सरकारने लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 डिसेंबर 2020 केली आहे. https://jeevanpramaan.gov.in या साईटवरूनही डिजिटली लाईफ सर्टिफिकेट जमा करता येईल.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Pension, Pensioners

    पुढील बातम्या