खूशखबर! लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत ते घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 11:14 AM IST

खूशखबर! लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट, 'हे' आहेत आजचे दर

मुंबई, 07 सप्टेंबर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेले तीन दिवस सतत बदल होतायत. आज ( 7 सप्टेंबर) दिल्ली आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 9 पैसे लीटर स्वस्त झालीय.आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्यानं हे दर घटलेत. दिल्लीत पेट्रोल 24 पैसे आणि डिझेल 16 पैसे प्रति लीटर स्वस्त झालंय.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटप्रमाणे आज मुंबई आणि कोलकत्ता इथे पेट्रोल 8 पैसे प्रति लीटर स्वस्त झालंय. तर दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथे डिझेसचे भाव 5 पैसे प्रति लीटर स्वस्त झालेत. कोलकत्ता इथे डिझेलची किंमत 6 पैसे प्रति लीटर कमी झालीय. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 71.77 रुपये, 77.46 रुपये, 74.50 रुपये आणि 74.57 रुपये प्रति लीटर झालेत. डिझेलचे दर क्रमश: 65.09 रुपये, 68.26 रुपये, 67.50 रुपये आणि 68.79 रुपये प्रति लीटर आहेत.

SBI मध्ये 477 जागांवर भरती, 'या' उमेदवारांना मिळेल पसंती

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

PNB होणार देशातली दुसरी मोठी बँक, ग्राहकांना करावे लागतील हे 6 बदल

Loading...

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

VIDEO: 'चंद्रावर जाण्याचं स्वप्न कायम', मोदींनी दिला इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Sep 7, 2019 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...