पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेल ग्राहकांना दिलासा मिळालाय. जाणून घ्या आजचे दर

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 11:20 AM IST

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

मुंबई, 06 सप्टेंबर : कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे आजही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालंय. पेट्रोलच्या दरात नऊ पैसे घट झालीय, तर डिझेल 6 पैसे कमी झालंय. काल गुरुवारी पेट्रोल 6 पैसे आणि डिझेसल 5 पैसे कमी झालं होतं.

महानगरांमधले पेट्रोल-डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोल 9 पैसे कमी होऊन ते आता 71.86 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर डिझेल 6 पैशांनी कमी होऊन 65.14 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 8 पैसे कमी होऊन 77.54 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर डिझेल 5 पैशांनी कमी होऊन 68.32 रुपये प्रति लीटर मिळतंय. कोलकत्त्यात पेट्रोल 74.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 67.54 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोल 74.67 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 68.85 रुपये प्रति लीटर आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, 'अशी' होईल निवड

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ किंवा घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

Loading...

मुंबई मेट्रो रेल्वेत मोठी व्हेकन्सी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

मुंबई मेट्रो रेल्वेत मोठी व्हेकन्सी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

पुरात अडकली शाळकरी मुलांची गाडी; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Sep 6, 2019 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...