सोनं झालं महाग, चांदीही कडाडली, 'हे' आहेत गुरुवारचे दर

सोनं झालं महाग, चांदीही कडाडली, 'हे' आहेत गुरुवारचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीची खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे दर

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : सोन्याच्या किमतीत लागोपाठ तिसऱ्या दिवशी वाढ झालीय. सोन्याचा भाव 83 रुपयांनी वाढलाय. दिल्लीत सोनं 39,271 रुपये प्रति 10 ग्रॅमनं वाढलंय. सोन्याबरोबर चांदीही कडाडलीय. चांदी 160 रुपयांनी वाढलीय. तिची किंमत 50,110 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. बुधवारी चांदी 49,950 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याच्या दरात घसरण झालीय. सोनं 1,542 डाॅलर प्रति औंस झालंय आणि चांदीची घसरण होऊन ती 19.35 डाॅलर प्रति औंस झालीय.

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, 'अशी' होईल निवड

दिल्लीत मात्र 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 39,271 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. बुधवारी सोनं 39,188 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं.

एचडीएफसी सिक्युरिटीचे सीनियर अनॅलिस्ट तपन पटेल म्हणाले, अमेरिका-चीनमधल्या वाढत्या ट्रेड वाॅरमुळे सोन्याची किंमत वाढलीय. अमेरिकानं चीनवर नवा टॅरिफ लावलाय. तो 1 सप्टेंबरपासून लागू झालाय. याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर झालाय.डाॅलरच्या तुलनेत रुपया कमी आहे. रुपया 72.40 प्रति डाॅलरवर बंद झालाय.

Teachers Day 2019 : शिक्षक व्हायचंय? मग या अभ्यासक्रमांची माहिती हवीच

भारतात दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर खरेदीतही घट होते. पण आता सोन्याबरोबरच चांदीचेही भाव घटल्यामुळे विक्रीमध्ये तेजी येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे.

SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

मात्र असंही बोललं जातंय की, पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

सोसायटीच्या भिंतीवर बिबट्याचा 'रॅम्पवॉक', पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Sep 5, 2019 05:49 PM IST

ताज्या बातम्या