खूशखबर! 3 दिवसांनी कमी झाले सोन्या-चांदीचे दर, 'या' आहेत गुरुवारच्या किमती

खूशखबर! 3 दिवसांनी कमी झाले सोन्या-चांदीचे दर, 'या' आहेत गुरुवारच्या किमती

Gold, Silver - सोन्या-चांदीच्या किमतीत घट झालीय. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : लागोपाठ 3 दिवस सोन्याच्या किमती वाढत होत्या. पण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या प्रभावामुळे दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 497 रुपयांनी कमी झालाय. तर 1 किलोग्रॅम चांदीच्या किमतीत 1,580 रुपयांची घट झालीय.

सोन्याचा नवा भाव

गुरुवारी ( 26 सप्टेंबर ) दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 497 रुपयांनी कमी होऊन 38,685 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव 95 रुपयांनी वाढला. तो 39,182 प्रति 10 ग्रॅम होता.

HDFC बँकेनं लाँच केलं नवं कार्ड, मिळतील 'हे' फायदे

चांदीची नवी किंमत

सोन्याप्रमाणे चांदीची किंमतही घसरलीय. इंडस्ट्रीची मागणी कमी झाल्यानं दिल्लीत 1 किलोग्रम चांदीचा दर 48,815 रुपयांनी कमी होऊन तो 47,235 रुपये झालाय. याआधी बुधवारी चांदीचा दर 95 रुपयांनी वाढून 48,815 रुपये प्रति किलोग्रॅम झालेला.

बँकेतले पैसे सुरक्षित ठेवायचेत? मग SBI चा हा सल्ला मानाच

कसं ओळखायचं अस्सल सोनं?

दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झाला बदल, जाणून घ्या नवे दर

पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.

सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.

चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.

VIDEO : पुण्याच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

First published: September 26, 2019, 6:32 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading