सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

Gold, Silver - सणासुदीचे दिवस यायला लागले तसे सानं-चांदी महागलं. जाणून घ्या आजचे दर

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : आज शुक्रवारी सोन्याच्या किमती वाढल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार दिल्लीत सोन्याची किंमत 70 रुपयांनी वाढलीय. त्यामुळे आता 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38,695 रुपये झालीय. काल ( 12 सप्टेंबर) सोन्याची किंमत 38,625 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,505 डाॅलर्स प्रति औंस आहे. तर चांदी 18.17 डाॅलर्स प्रति औंस आहे.

सोन्याबरोबर चांदीही महाग झालीय. चांदी 172 रुपयांनी वाढलीय. 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 48,400 रुपये आहे. काल (12 सप्टेंबर) चांदी 48,228 रुपये प्रति किलो होती. चांदीच्या नाण्यांची लिवाली वाढल्यानं चांदीची किंमत वाढलीय.

स्वस्त सोनं खरेदी करायचा आजचा शेवटचा दिवस, 'इथे' मिळतेय सवलत

PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात 'असे' मिळतील पैसे

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमजोर - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

तुम्हाला गोल्ड बाॅण्ड खरेदी करायचेत? सरकारी गोल्ड बाॅण्डची नवी सीरिज सोमवार 9 सप्टेंबरपासून सुरू झालीय.  9 ते 13 सप्टेंबरपर्यंत हे गोल्ड बाॅण्ड तुम्ही खरेदी करू शकता. याची किंमत 3,890 रुपये प्रति ग्रॅम आहे. जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील, डिजिटल पेमेंट करतील त्यांना इश्यू प्राइझ 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आरबीआयनं सांगितलं, 'अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाॅण्डचं इश्यू प्राइज 3,840 रुपये प्रति ग्रॅम आहे.'

'सीएम गो बॅक' म्हणत तरुणीने फेकला फडणवीसांच्या गाडीवर शाईचा फुगा LIVE VIDEO

First published: September 13, 2019, 5:39 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading