मुंबई, 13 जुलै : कोरोना संकटाचा (Corona Crises) सामना करण्यासाठी लसीकरण (Corona Vaccination) मोहिम प्रभावी ठरली. कोरोना लसीकरणामुळे अनेकांचे जीव वाचलं असं म्हणता येईल. कोट्यवधी लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले. याच लसीकरणाबाबत एक मेसेज सध्या सोशल मीडियावर (Viral on Social Media) व्हायरल होत आहे. जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर सरकार तुम्हाला 5,000 रुपये देणार आहे, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सरकारने खरंच अशी काही घोषणा केली आहे का? याबद्दल माहिती घेऊ.
एका व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्या लोकांना फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर सरकार तुम्हाला 5000 रुपये देणार आहे. सोशल मीडियावर हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. लस दिल्यानंतर 5000 रुपये मिळण्याचा हा दावा खरा आहे की खोट यांची पडताळणी पीआयबी फॅक्ट चेकने आहे.
कोरोनापाठोपाठ पुण्यातील Serum Institute च्या Cervical cancer vaccine ला मंजुरी; पहिलीच भारतीय लस
पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करून ही माहिती दिली आहे की, व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की ज्यांना कोविडची लस मिळाली आहे त्यांना ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर पंतप्रधानांच्या जन कल्याण विभागाकडून 5,000 दिले जात आहेत. या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. कृपया हा फेक मेसेज फॉरवर्डही करू नका, असं आवाहनही पीआयबीने केलं आहे.
एक वायरल मैसेज में दावा किया जा रहा है कि जिन लोगों ने कोविड वैक्सीन लगवा ली है उन्हें एक ऑनलाइन फॉर्म भरने के बाद प्रधानमंत्री जन कल्याण विभाग द्वारा ₹5,000 प्रदान किए जा रहे हैं #PIBFactcheck:
▶️ इस मैसेज का दावा फर्जी है ▶️ कृपया इस फर्जी मैसेज को फॉरवर्ड न करें pic.twitter.com/AV8asQzexu — PIB Fact Check (@PIBFactCheck) July 12, 2022
कोरोनापेक्षाही खतरनाक Marburg Virus चे संशयित रुग्ण आढळले; WHO कडूनही Alert
व्हायरल मेसेजची फॅक्ट चेक करता येईल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून सर्वांनी सावध राहावे. पीआयबीने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे. असे फेक मेसेज सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात, जर तुम्हाला कधी असा फेक मेसेज आला तर तो फॉरवर्ड करू नका, पण त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करा. आपण PIB द्वारे फॅक्ट चेक करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला PIB https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकवर क्लिक करुन माहिती द्यावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही +918799711259 या WhatsApp क्रमांकावर किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडीओ पाठवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Pm modi, Viral