Home /News /coronavirus-latest-news /

आता Omicron व्हेरिएंटवरही येणार लस; Pfizer ने सुरू केली निर्मिती, वाचा कधी होणार उपलब्ध

आता Omicron व्हेरिएंटवरही येणार लस; Pfizer ने सुरू केली निर्मिती, वाचा कधी होणार उपलब्ध

ओमायक्रॉनवर लस बनवली जात असल्याची माहिती औषध निर्माण कंपनी फायझरनं (Pfizer Vaccine) दिली आहे. मार्च महिन्यापर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली 11 जानेवारी : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे. कोरोनाच्या (Covid 19) दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. सगळ्याच देशांत लसीकरण (Corona Vaccine on Omicron Variant) मोहीम जोमानं सुरु आहे. ओमायक्रॉनवर लस बनवली जात असल्याची माहिती औषध निर्माण कंपनी फायझरनं (Pfizer Vaccine) दिली आहे. मार्च महिन्यापर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविड-19 चा संसर्ग वाढत असल्याने फायझर आधीपासूनच लस निर्मिती करत आहे. अनेक सरकारच्यावतीनेही लसीबाबत वारंवार विचारणा केली जात आहे, सध्याच्या रुग्णसंख्येत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. ही लस मार्च 2022 पर्यंत तयार होईल, असं फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बुर्ला यांनी म्हटल्याचं CNBC च्या एका वृत्तामध्ये म्हटलं आहे. ‘आता या लसीची गरज पडेल का? ती वापरली जाईल का ? याबद्दल मला माहिती नाही. पण कंपनीने ती तयार केली आहे,’ असंही अल्बर्ट यांनी म्हटलं आहे. पालकांनो लहान मुलांना जपा! Omicron बाबत तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती सध्याच्या परिस्थितीत कोरोना लसीचे दोन डोस आणि त्यानंतर बूस्टर शॉट यामुळे ओमायक्रॉनपासून व्यवस्थित संरक्षण होत आहे. मात्र ओमायक्रॉन व्हेरिएंट हेच लक्ष्य ठेवून एक लस असेल. ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होतो. पण त्याचा परिणाम अगदी कमी किंवा अगदी लक्षणं नसलेले रुग्णही असतात, असंही लक्षात आलं आहे. CNBC ला मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टीफन बन्सेल यांनीही सोमवारी विशेष मुलाखत दिली. त्यांची कंपनी एक बूस्टर डोस विकसित करत असल्याची माहिती दिली. 2022 मधील ओमायक्रॉनसह कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटवर हा डोस परिणामकारक असेल असं बन्सेल यांचं म्हणणं आहे. ‘या बूस्टर डोसबद्दल जगभरातील आरोग्यविषयक तज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे,’असं त्यांनी सांगितलं. डेल्टा, ओमिक्रॉननंतर आता डेल्टाक्रॉन; नेमका काय आहे कोरोनाचा हा नवा प्रकार? गेल्या वर्षी फायझरने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक गोळी नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यातही मदत करते, असा दावा फायझरच्या वतीनं करण्यात आला होता. जवळपास 2,250 लोकांवर याचं संशोधन करण्यात आलं. त्यानंतर कोविड प्रतिबंधक गोळी व्हायरसविरोधात प्रभावी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं होतं. कोविड- 19 ची सुरुवातीची लक्षणं दिसू लागल्यानंतर ज्यांना जास्त धोका आहे अशा वयस्कर माणसांना ही गोळी देण्यात आली. तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या आणि मृत्युंची संख्या ८९ टक्के कमी झाल्याचंही सांगण्यात आलं होतं. ओमायक्रॉनवर लस आली तर आणखीनच उपयुक्त होईल. कोविडपासून बचाव करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine

पुढील बातम्या