मुंबई, 11 ऑक्टोबर : रिझव्र्ह बँकेकडून व्याजदरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कर्जदार निराश झाले आहेत. तर ज्या गुंतवणूकदारांनी बँका आणि अन्य वित्तीय संस्थांमध्ये एफडी केली आहे, त्यांना आता मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळत असल्याने ते सुखावले आहेत. या वर्षी मे ते सप्टेंबरपर्यंत आरबीआयने रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर बँकांनी कर्ज आणि बचत योजनांच्या व्याजदरातही वाढ केली आहे. खरं तर, गृहकर्ज आणि इतर बचत योजनांवरील व्याजदर बेंचमार्कशी जोडलेले आहेत. जेव्हा जेव्हा रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवते किंवा कमी करते तेव्हा ते सर्व बँक ग्राहकांना दिले जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक व्याज मिळते. याच्याशीच संबंधित फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 11 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत. बँकेने सर्व मुदतीच्या FD वर व्याजदर वाढवले - फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 45 दिवसात मुदत ठेवींवर 3% आणि 46 दिवस ते 90 दिवसात पूर्ण होणाऱ्या FD वर 3.5% व्याज देत राहील. त्याच वेळी, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आता 91 ते 180 दिवसांच्या दरम्यानच्या मुदतीच्या ठेवींवर 4.5% व्याज देईल. तर 181 ते 364 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 5.5% व्याजदर मिळेल. त्याच वेळी, 12 ते 24 महिने पूर्ण झालेल्या मुदत ठेवींवर 6.75 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 500 दिवसांच्या कालावधीसाठी 7.25 टक्के आणि 1000 दिवसांच्या कालावधीसाठी 7.75 टक्के व्याजदर असेल. ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज - फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत, ज्येष्ठ नागरिकांना सर्व मुदतीच्या FD वर मानक व्याजदरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 3.50% आणि 8.25% दराने व्याज मिळेल. हेही वाचा - सोन्यावर कधी, कुठे आणि किती कर आकारला जातो, खरेदी करणार असाल तर वाचाच बँकेच्या वेबसाइटनुसार, “60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची व्याख्या ज्येष्ठ नागरिक म्हणून केली जाते. संयुक्त खातेदारांच्या बाबतीत, जेथे खातेदारांपैकी ज्येष्ठ नागरिक या मुदत ठेवीचा ‘प्रथम धारक’ असेल तरच ज्येष्ठ नागरिक FD वरील व्याज दर लागू होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.