जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोन्यावर कधी, कुठे आणि किती कर आकारला जातो, खरेदी करणार असाल तर वाचाच

सोन्यावर कधी, कुठे आणि किती कर आकारला जातो, खरेदी करणार असाल तर वाचाच

सोन्यावर कधी, कुठे आणि किती कर आकारला जातो, खरेदी करणार असाल तर वाचाच

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्यावर केव्हा, कुठे आणि किती कर आकारला जातो हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : सोने खरेदी ही नेहमीच भारतीयांची पसंती राहिली आहे. सोनी विकत घेतल्यावर वर्षभरात अनेक प्रसंग येतात. लग्नसोहळा असो की अक्षय्य तृतीया, धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत सोने खरेदी करणे शुभ असते. यासोबतच काही लोक यात गुंतवणुकीच्या दृष्टीने पैसेही गुंतवतात. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, यावर्षी धनत्रयोदशीला एका दिवसात सुमारे 30 टन सोन्याची विक्री झाली आहे. सोन्याच्या दरातही या काळात सातत्याने वाढ होत आहे. पण, सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्यावर केव्हा, कुठे आणि किती कर आकारला जातो हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोन्याच्या दागिन्यांवर किती कर? बाजारातील दागिन्यांच्या वजनानुसार आणि कॅरेटनुसार सोन्याच्या किमती बदलतात. तथापि, सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर त्याचे मूल्य आणि मेकिंग चार्जेसवर 3 टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) आकारला जातो. तुम्ही दागिन्यांचे पैसे कोणत्याही पद्धतीने भराल, तुम्हाला 3% GST भरावा लागेल. विकल्यावर कर लागतो का? क्वचितच लोकांना माहित असेल की सोने खरेदी करण्याबरोबरच सोने विकण्यावरही कर लागतो. विक्री करताना तुमच्याकडे किती दिवसांपासून दागिने आहेत ते पाहिले जाते. कारण, त्या कालावधीनुसार त्यावर कर लागू होईल. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर द्यावे लागेल. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) - खरेदीच्या तारखेपासून ३ वर्षांच्या आत तुम्ही दागिने विकल्यास सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाईल. STCG च्या नियमांनुसार कर भरावा लागेल. तुम्ही दागिने विकून मिळवलेल्या रकमेवर आयकर स्लॅबनुसार कर कापला जाईल. हेही वाचा -  अबब! तब्बल 4693 मीटर उंचीवरचं जगातील एकमेव ATM; पैसे काढण्यासाठी लागते रांग लाँग टर्म कैपिटल गेन (LTCG) - 3 वर्षे किंवा त्याहून अधिक जुने दागिने विकण्यासाठी, लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) च्या आधारावर कर भरावा लागेल. LTCG नुसार, कर दर 20.80 टक्के असेल. गेल्या अर्थसंकल्पातच एलटीसीजीवरील उपकर 3 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे. कराच्या दरामध्ये उपकर समाविष्ट आहे. मात्र, त्यापूर्वी सोने विक्रीवर 20.60 टक्के एलटीसीजी आकारले जात होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात